SAKAL Special : चालता- बोलता! एबी फॉर्मवरील स्पेलिंगने चुकविला काळजाचा ठोका

SAKAL Special : कधी नव्हे, ती यंदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी चुरस झाली.
bhaskar bhagre
bhaskar bhagre esakal

एबी फॉर्मवरील स्पेलिंगने चुकविला काळजाचा ठोका

कधी नव्हे, ती यंदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी चुरस झाली. यात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान, शिक्षक असलेले भास्कर भगरे यांना उमेदवारी देत बाजी मारली. अनपेक्षितपणे उमेदवारी मिळाल्यावर, मतदारसंघातील काना-कोपऱ्यात नाव पोहोचण्यासाठी गत महिनाभरापासून भगरे घाम गाळत आहेत.

मतदारसंघात चांगली वातावरणनिर्मिती झालेली असल्याने यात कोठेही दगाफटका नको, यासाठी भगरे अहोरात्र काळजी घेत आहेत. इतकी काळजी करूनही त्यांच्या एबी फॉर्मवर टाकलेल्या नावाचं स्पेलिंग चुकलं. स्पेलिंग चुकल्याने भगरे यांना धडकी भरली.

अखेर त्यांच्या मदतीला गोकुळ पिंगळे धावून आले. त्यांनी मुंबईत जाऊन अचूक स्पेलिंग लिहिलेला नवा एबी फॉर्म आणला आणि दाखल केला, तेव्हा कुठे भगरेंच्या जीवात जीव आला. चुकलेल्या स्पेलिंग अन एबी फॉर्मची मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली.

(SAKAL Special chalta bolta Spelling on AB form misses mark )

bhaskar bhagre
SAKAL Special : चालता- बोलता..! तुमचे मौनव्रत सुटले का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com