Latest Marathi News | नाशिक : रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन 5 महिन्यांपासून रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary

नाशिक : रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन 5 महिन्यांपासून रखडले

नाशिक : जिल्ह्यातील कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येणाऱ्या आश्रमशाळशाळेवरील रोजंदारी कर्मचारींवर मानधनाअभावी उपासमारीची वेळ आलेली आहे. मागील चार महिन्यापासून वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! हुंड्याच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

आश्रमशाळेत शिक्षक भरती न झाल्याने अनेक पदे रिक्त आहे. रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून याठिकाणी रोजंदारी, तासिका, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी, शिक्षक कार्यरत आहे. कळवण प्रकल्पातंर्गत एकूण ४० शासकीय आश्रमशाळा असून या शाळांमधील वर्ग तीन आणि वर्ग ४ ची सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत,त्यामुळे कळवण प्रकल्प कार्यालयांतर्ग येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेंवर सद्यस्थितीत वर्ग तीन चे सुमारे १२५ शिक्षक रोजंदारी पद्धतीने कार्यरत आहे. तर वर्ग चार कर्मचाऱ्यांची संख्या देखील १३० च्या आसपास आहे. मागील पाच महिन्यापासून या सर्वांना वेतन अदा करण्यात आलेले नाही.

हेही वाचा: Health : फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका होणार कमी !

दर महिन्याला वेतनबाबत प्रशासनाकडे विचारण केली तर त्यांना त्यांच्याकडून मानधनासाठी तरतूदच उपलब्ध नसल्याने पैसे मिळणार नाही असे उत्तरे दिली जात आहे. प्रकल्प अधिकारी यांनी या रोजंदारी कर्मचारी यांचे वेतन वेळेवर अदा करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Nashik Salary Of Daily Wage Workers Stopped For 5 Months

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikEmployeessalary