दुर्दैवी! हुंड्याच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

अवघ्या सहा महिन्यांपुर्वीच तिचा हालभावी येथील भरमाप्पा याच्याबरोबर विवाह झाला.
Young woman commits suicide
Young woman commits suicide sakal
Updated on
Summary

अवघ्या सहा महिन्यांपुर्वीच तिचा हालभावी येथील भरमाप्पा याच्याबरोबर विवाह झाला.

बेळगाव - पतीसह सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवार (ता.११) हालभावी येथे ही घटना घडली असून रेणूका भरमाप्पा नायक (वय २०, रा. हालभावी) असे तीचे नाव असून या प्रकरणी काकती पोलिसात हुंडाबळी कायद्याअंतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मयत रेणुकाचे वडील बाळाप्पा हुलेप्पा नायक (रा. हुल्यानुर) यानी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसानी पती भरमाप्पा मुशाप्पा नायक नातेवाईक सिध्दाप्पा भरमाप्पा नायक, दिर हालप्पा मुशाप्पा नायक, यल्लाप्पा मुशाप्पा नायक, नंनद कमलव्वा हलाप्पा नायक (सर्वजण रा. हालभावी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. हुल्यानुर येथील रेणुकाचा अवघ्या सहा महिन्यांपुर्वी हालभावी येथील भरमाप्पा याच्याबरोबर विवाह झाला.

Young woman commits suicide
Ayodhya : 1800 कोटी रुपयांत बांधणार राम मंदिर; परिसरात 'या' मूर्तींचेही होणार दर्शन

लग्न झालेल्या दिवसापासूनच पतीसह सासरच्या मंडळीनी तीचा हुंड्यासाठी छळ चालवला होता. माहेरहून सोन्‍याचे दागिने घेऊन ये अशी वारंवार मागणी करत होते. दागिने आणले नाहीस तर आपल्या घरी येऊ नकोस कुठेतरी जाऊन जीव दे. आम्ही भरमाप्पाचा दुसरा विवाह करुन देतो. तु आमच्‍या घरी येऊ नको. असे म्हणत तीचा छळ चालवला होता. वारंवार वाद घालून करुन तिला मानसिक त्रास दिला जात होता.

रेणुकाचे वडील गवंडी काम करतात त्यामुळे तिच्या माहेरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने आणायचे कोठून असा सवाल तिच्यापुढे होता. त्यामुळे दररोजच्‍या छळाला कंटाळून मानसिक अस्वस्थपणातून काल सासरी तुळईला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

Young woman commits suicide
सप्टेंबरमध्ये पर्यटनाचा प्लॅन करताय? 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या..

या घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची खबर तिच्या माहेरी कळवण्यात आली. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कायदेशीर सोपस्कार पुर्ण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी तिच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश काळज पिळवटून टाकणारा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com