
Nashik Latest News: स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत आले आहेत, याप्रकरणी त्यांना नाशिक कोर्टात हजर राहावे लागणार आहे. त्याआधी ठाकरेंच्या शिवसैनिकाने त्यांना इशारा दिला होता. सावरकर आणि हिंदुत्व हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर काळे फासणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उप महानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे.