Sanjay Raut Nashik Daura : गोमांस कंपन्यांकडून देणगी घेणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये; संजय राऊत यांची भाजपवर टीका

Nashik : देशातील गोमांस विक्री करणाऱ्या १० कंपन्यांकडून पाच हजार कोटीची देणगी भाजपने घेतली असून, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी अशोकनगर येथील सभेत केली.
Sanjay Raut speaking at a campaign rally for Nashik Lok Sabha candidate Rajabhau Waje on Saturday.
Sanjay Raut speaking at a campaign rally for Nashik Lok Sabha candidate Rajabhau Waje on Saturday.esakal

सातपूर : लोकसभा निवडणूक देशाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे म्हणून माकप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह आघाडीचे सर्व पक्ष देशाच्या मानगुटीवर बसलेल्या भस्मासूरला खाली खेचण्यासाठी एकत्र आले आहेत. देशातील गोमांस विक्री करणाऱ्या १० कंपन्यांकडून पाच हजार कोटीची देणगी भाजपने घेतली असून, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी (ता. ११) अशोकनगर येथील सभेत केली. (Nashik Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले, की येणाऱ्या काळात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काय आहे तेच दाखवणार आहोत. नंदुरबार ते नाशिक अशा उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जागा आघाडी सरकार जिंकत असल्याने नरेंद्र मोदी आता आम्हाला ऑफर देत आहे. पण ते आता शक्य नाही. या वेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, शहराध्यक्ष विलास शिंदे, दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार नितीन भोसले, माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आघाडीचे उमेदवार वाजे म्हणाले, की आजपर्यंत जे राजकारण शिकलो नाही ते ४५ दिवसात शिकलो आहे. (latest marathi news)

Sanjay Raut speaking at a campaign rally for Nashik Lok Sabha candidate Rajabhau Waje on Saturday.
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

उद्योग बंद का झाले व कामगारांच्या प्रश्‍नाबाबत खासदारांनी बोलले पाहिजे, ते मी दिल्लीत जाऊन करणार आहे. उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी बडगुजर यांनी माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावर सडकून टीका केली.

यासह काँग्रेस नेत्या हेमलता पाटील, माकपचे नेते डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, माजी नगरसेवक मधुकर जाधव, माजी आमदार भोसले आदींनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी बॉश कंपनीच्या कामगारांनी वाजे यांच्या प्रचारासाठी ५१ हजार रूपयाची देणगी दिली.

Sanjay Raut speaking at a campaign rally for Nashik Lok Sabha candidate Rajabhau Waje on Saturday.
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com