Nashik Saptashringi Devi : आदिमायेच्या चैत्रोत्सवात लालपरीला 66 लाखांचे उत्पन्न

Saptashringi Devi : राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराने सवलतीसह ५५ लाख ५१ हजार २९१ रुपयांचे उत्पन्न मिळवीत १ लाख ६१ हजार ७४४ भाविकांना सप्तश्रृंगीचे दर्शन घडविले.
Crowds of buses and devotees in the temporary bus stand erected during Chaitrotsav at Saptshringi Fort
Crowds of buses and devotees in the temporary bus stand erected during Chaitrotsav at Saptshringi Fortesakal

Nashik Saptashringi Devi : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील आदिमाया भगवतीच्या चैत्रोत्सव कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराने सवलतीसह ५५ लाख ५१ हजार २९१ रुपयांचे उत्पन्न मिळवीत १ लाख ६१ हजार ७४४ भाविकांना सप्तश्रृंगीचे दर्शन घडविले. सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवा दरम्यान नांदुरी ते सप्तश्रृंग गड हा रस्ता खाजगी वाहनांसाठी बंद ठेवला जात असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारेच भाविकांना प्रवास करावा लागतो. ( Income of 66 lakhs to Lalpari during Chaitrotsav of Adimaye )

नाशिकसोबत धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर विभागातील वेगवेगळ्या आगारातून सप्तशृंगी गडावर बसेस सोडण्यात येतात. नाशिक विभागातील कळवण आगाराने चैत्रोत्सवातील १७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत नांदुरी ते सप्तश्रृंगीगड, सप्तशृंगी गड ते नाशिक व मालेगांव या मार्गासाठी १०० जादा बसची व्यवस्था केली होती.

भाविकांच्या संख्येनुसार रोज सरासरी ३५ बसचा वापर करुन ३ हजार ६४६ फेऱ्याद्वारे कळवण आगाराने ७ हजार ८८२ लहान मुले, १ हजार ९६२ जेष्ठ नागरीक, ८ हजार ९५३ अमृत महोत्सव जेष्ठ नागरिक, महिला सन्मानांतर्गतांतर्गत ५३ हजार ८७२ महिला भाविक यांच्यासह एकुण १ लाख ६१ हजार ७४४ इतक्या भाविकांची वाहतूक केली.  (latest marathi news)

Crowds of buses and devotees in the temporary bus stand erected during Chaitrotsav at Saptshringi Fort
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगीदेवीचे 20 हजार भाविकांनी घेतले दर्शन

यातून कळवण आगारास विनासवलत ४३ लाख ९४ हजार ३०८ रुपयांचे तर सवलतीसह ५५ लाख ५१ हजार २९१ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार व्यवस्थापक हेमंत पगार, आगार वाहतूक निरीक्षक सुरेश पवार, लिपिक विजय दळवी यांनी दिली.

अर्थात मागील चैत्रोत्सवात २०२३ वर्षांच्या तुलनेत ५ हजार ७३४ आधीक प्रवाशांची वाहतूक केली असून यातून मागील वर्षांच्या तुलनेत ७ लाख ९ हजार ५२४ रुपये इतके अधिक उत्पन्न मिळविले आहे. चैत्रोत्सवात खानदेशातील भाविकांची सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी पदयात्रेकरुंचे प्रमाण मोठ्या संख्येने होते. त्यात ९० टक्के पदयात्रेकरु हे पदयात्रे दरम्यान आपले साहित्य ठेवण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहानांनी नांदुरी पंर्यंत घेवून आली होती.

पदयात्रेकरुसह दुचाकी, कार, टेम्पो, पीकअप असा खासगी वाहानाने नांदुरीपर्यंत गडावर यात्रोत्सवात सुमारे पाच लाख भाविकांनी हजेरी लावली. याशिवाय नाशिक, धुळे, जळगांव विभागातील ठिकठिकाणच्या आगारातून सुमारे दोनशेच्या वर बस थेट सप्तशृंगी गडावर भाविकांची वाहतूक करीत होत्या. त्यामूळे परिवहन महामंडळाने सुमारे तीन ते चार लाखांवर भाविकांचा सोयीस्कर व सुखकर प्रवास घडविला आहे.

Crowds of buses and devotees in the temporary bus stand erected during Chaitrotsav at Saptshringi Fort
Saptashringi Devi Gad : सप्तशृंगीमातेचे मंदिर 31 डिसेंबरला 24 तास खुले राहणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com