Saptashringi Devi Gad : सप्तशृंगीमातेचे मंदिर 31 डिसेंबरला 24 तास खुले राहणार

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावरील श्री भगवती मंदिर नवर्षानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
temple of Saptashrungi Mata will be open for 24 hours on December 31 nashik
temple of Saptashrungi Mata will be open for 24 hours on December 31 nashik esakal

Saptashringi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावरील श्री भगवती मंदिर नवर्षानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.(temple of Saptashrungi Mata will be open for 24 hours on December 31 nashik news)

जिल्ह्यातून नव्हे, तर राज्य, राज्याबाहेरून भाविक नवीन वर्षाला दर्शन घेण्यासाठी सप्तशृंग गडावर हजेरी लावतात. नवीन वर्षाची सुरवात भगवतीच्या आशीर्वादाने व्हावी, ही अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.

यंदा ३१ डिसेंबर रविवारी असल्यामुळे सर्वच शासकीय कार्यलयांना असलेली सुट्टी, तसेच नाताळच्या सुट्यांमुळे राज्य व राज्याबाहेरील चाकरमाने तीर्थटन व पर्यटनासाठी घराबाहेर पडली असल्याने रविवारी व १ जानेवारीला सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

temple of Saptashrungi Mata will be open for 24 hours on December 31 nashik
Saptashrungi Devi Gad : उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो! सप्तशृंगी गडावर भाविकांचा ललिता पंचमीचा जागर

हे गृहित धरून सप्तशृंगी निवासिनी देवी न्यास विश्वस्त मंडळाने दरवर्षाप्रमाणे यंदाही आदिमायेचे मंदिर ३१ डिसेंबरला २४ तास व १ जानेवारीला दैनंदिन वेळेनुसार रात्री नऊपर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वस्त ॲड. ललीत निकम यांनी दिली.

temple of Saptashrungi Mata will be open for 24 hours on December 31 nashik
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचा महापूर; अष्टमीनिमित्त होम, पालखी मिरवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com