Saptashrungi Devi Temple : आदिमायेचा सप्तशिखर टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमला

Saptashrungi Devi : आदिमायेचे माहेर असलेल्या खानदेशातून आई भगवतीच्या भेटीसाठी आतुर झालेले लाखो पदयात्रेकरु आदिमायेचा जयघोष मजल दरमजल करीत सप्तशृंगी गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.
Electric lighting on the temple.Adv. Lalit Nikam and Purohit.
Electric lighting on the temple.Adv. Lalit Nikam and Purohit.esakal

Saptashrungi Devi Temple : आदिमायेचे माहेर असलेल्या खानदेशातून आई भगवतीच्या भेटीसाठी आतुर झालेले लाखो पदयात्रेकरु आदिमायेचा जयघोष मजल दरमजल करीत सप्तशृंगी गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. दरम्यान शुक्रवारी (ता.१९) चैत्रोत्सवातील तिसऱ्या माळेस व कामदा एकादशीस तीस हजार भाविकांनी श्री. भगवतीचे दर्शन घेतले. आदिमायेच्या मूर्ती संवर्धन कार्यानंतर आदिमायेची सुमारे सहाशे ते सातशे वर्षांनंतर समोर आलेली स्वयंभू श्री भगवतीची मूळमूर्तीचे नवरुपानंतरचा दुसरा चैत्रोत्सव मंगलमय वातावरणात सुरु आहे. (nashik Saptashrungi Devi Temple Adimaya Sapta Shikhara )

यात्रोत्सवात चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील-अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वितेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. चैत्र शु. ११ उत्सवाची सकाळची पंचामृत महापूजा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ललित निकम यांनी कुटुंबासह केली. प्रसंगी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, मंदिर प्रमुख प्रशांत निकम, सह मंदिर प्रमुख सुनील कासार आदी उपस्थित होते.

विश्वस्त संस्थेने देणगीदारांच्या सौजन्याने १०० बाय १३० मीटर आकारमानाचे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दोन वॉटरप्रुफ मंडप उभारले असून मंडप व परिसरात निगराणी व सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणेची व्यवस्था केली आहे. पहिली पायरीच्या प्रवेशद्वाराजवळ विश्वस्त संस्थेने नारळ व नंदादीपला तेल अर्पण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. यांसह श्री भगवती लाइव्ह दर्शनासाठी एलईडी टीव्ही व्यवस्था केली आहे. तसेच भाविकांना मेटल डिटेक्टरमधून तपासणी करून मंदिरात सोडण्यात येत आहे. (latest marathi news)

Electric lighting on the temple.Adv. Lalit Nikam and Purohit.
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? लवकरच निर्णय होण्याचे सूतोवाच

शुक्रवारी (ता.१९) ५ ते ६ हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. चैत्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी भाविकांची गर्दी कमी होती. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस व पुढील तिन्ही दिवस धार्मिक व चैत्रोत्सवाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान चैत्रोत्सवातील मुख्य दिवस चावदस म्हणजेच चतुर्दशी ही सोमवारी (ता.२२) असून या दिवशी श्री भगवतीचा व भाविकांचा मिलन सोहळा होईल. या दिवसांपर्यंत गडावर पदयात्रेने पोचण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

चैत्रोत्सवात प्रथमच देवी कथा

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड व गोदामृत सामाजिक सेवाभावी संस्था नाशिक अंतर्गत सेवाभावी वारकरी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शिवालय तीर्थ परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात देवी भागवत कथा व अखंड हरीनाम सप्ताहास उत्साहात सुरवात झाली. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत हे होत असून देवी भागवत कथेचे निरूपण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्ता कांचन जगताप करीत आहेत.

तसेच हरिनाम सप्ताहात बुधवार (ता.१७) सुधाकर महाराज वाघ (त्रंबकेश्वर), गुरुवारी (ता.१८) शांताराम महाराज गांगुर्डे (आळंदी) यांचे तर शुक्रवारी (ता.१९) पुरुषोत्तम महाराज काळे (निफाड) यांचे कीर्तन झाले. शनिवारी (ता.२०) युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर (पुणे), रविवारी (ता.२१) डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर (लहवित), सोमवार (ता.२२) मनोहर महाराज साईखेडे (इगतपुरी) व मंगळवारी (ता.२३) प्राविण्यकृष्ण महाराज पवार (मांजरी) यांचे कीर्तन होणार आहे.

Electric lighting on the temple.Adv. Lalit Nikam and Purohit.
Saptashrungi Devi Temple : आदिमाया सप्तशृंगी मंदिरात 8 किलोची चांदीची कृष्णमूर्ती अर्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com