Nashik News : सारडा सर्कल- मुंबई नाका मार्गास भंगार वाहनांचा वेढा!

Nashik News : मोडकळीस आलेल्या भंगार वाहने सारडा सर्कल ते मुंबई नाका मार्गाच्या दुतर्फा वर्षानुवर्षे पडून आहे.
A siege of wrecked vehicles on Sarada Circle to Mumbai Naka route.
A siege of wrecked vehicles on Sarada Circle to Mumbai Naka route.esakal

जुने नाशिक : मोडकळीस आलेल्या भंगार वाहने सारडा सर्कल ते मुंबई नाका मार्गाच्या दुतर्फा वर्षानुवर्षे पडून आहे. मार्गास बकाल स्वरूप आले असून अन्य वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Nashik Sarda Circle Mumbai Naka route surrounded by junk vehicles)

शहरातील मोडकळीस आलेले चारचाकी वाहने खरेदी करून त्यातील उपयुक्त साहित्य काढून विक्री करण्याचा व्यवसाय सारडा सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेकडो कुटुंबीयांचा यावर उदरनिर्वाह सुरू आहे. असे जरी असले तरी येथील काही व्यावसायिकांकडून मात्र व्यवसायाच्या नावाखाली रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून वाहतूक कोंडी केली जात आहे.

येथील व्यावसायिक शहराच्या विविध भागातून मोडकळीस आलेले वाहने आणून उभे करतात. यातील उपयुक्त वस्तू विक्रीसाठी काढून दुकानात ठेवतात. वाहनाचा सांगडा मात्र तसाच रस्त्याच्या बाजूला ठेवला जातो. एक नाहीतर अनेक वाहनांचे सांगाडे सारडा सर्कल ते मुंबई नाका मार्गावर पडून आहे.

त्यात चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांच्या सांगाड्यांचाही समावेश आहे. आधीच अरुंद मार्ग त्यात या वाहनांच्या अतिक्रमणाने रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. यामुळे परिसरास बकाल स्वरूप येणे, वाहतूक कोंडी होणे, सांगाड्याखाली कचरा पडून राहणे त्यामुळे डास मच्छरांच्या प्रमाणात वाढ होणे.  (latest marathi news)

A siege of wrecked vehicles on Sarada Circle to Mumbai Naka route.
Muslim Voters: मुस्लिमांचा कौल कोणाकडे? मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वाची; मतदान वाढविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न

परिसरातील रहिवाशांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अडचणीला सामोरे जाणे. अशा विविध समस्या भेडसावत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही महापालिका पूर्व विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या वाहनांच्या अतिक्रमणात अधिक भर पडत आहे. येथील अतिक्रमण काढण्यात यावे. व्यावसायिकांनी निकामी सांगाडे त्वरित भंगारमध्ये विक्री करत रस्ते मोकळे करण्यात यावे. अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

कारवाईचा केवळ फार्स

महापालिकेकडून सुमारे वर्षभरापूर्वी या भागात काही प्रमाणात कारवाई केली होती. ती केवळ फार्स ठरली. देखावा करण्यासाठी काही वाहनांचे अतिक्रमण काढले. व्यावसायिकांना सूचना देऊन जबाबदारी पूर्ण करण्यात आली. ठोस कारवाई अद्यापही झालेली नाही.

परिस्थिती जैसे थे झाली आहे. पूर्व विभागाचे अतिक्रमण पथक केवळ दबावाखाली काम करत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यास जणू त्यांना आनंद वाटत आहे. असेही नागरिकांकडून बोलले जात आहे.

A siege of wrecked vehicles on Sarada Circle to Mumbai Naka route.
Ramadan Festival : शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी बाजारपेठ सज्ज! चारोळीचे दर गगनाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com