आदर्शवत सरपंच! 9 दिवसांच्‍या बाळासह बैठकीला हजर

आदर्शवत सरपंच! 9 दिवसांच्‍या बाळासह बैठकीला हजर

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे यांनी त्यांच्या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सहभाग घेतला.

पुष्पा साहेबराव बांबळे यांची प्रसूती नऊ दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आजच्या बैठकीला त्या कन्यारत्नासह उपस्थित राहिल्या. गावातील पाणी पुरवठा, विजेचा प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामे, शिवार रस्ते या प्रश्नाचा आढावा त्यांनी घेतला. ग्रामसेवक नितीन हेंबाडे, उपसरपंच चंद्रभागा बहिरू केवारे व सदस्यांनी बांबळे यांचे स्वागत केले.

आदर्शवत सरपंच! 9 दिवसांच्‍या बाळासह बैठकीला हजर
माझा काय संबंध?, बदनाम का करतात?; अजित पवार यांचा सवाल

‘‘सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मी जबाबदारीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यतत्पर राहीन,’ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. सरपंच या नात्याने गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी नऊ दिवसांपूर्वी जन्म दिलेल्या बाळासह मासिक बैठकीला उपस्थित राहिले. ते मी माझे कर्तव्यच समजते,’’ असे पुष्पा बांबळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com