Foreign Scholarship : राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती! अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदत

Nashik News : विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे बळ मिळणार आहे.
Foreign Scholarship
Foreign Scholarshipesakal

Nashik News : विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे बळ मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी इच्छुक व पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. त्‍यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे.

अटी-शर्तींचे पालन करणाऱ्या विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासंदर्भात इतरमागास बहुजन कल्‍याण विभागातर्फे माहिती जारी करताना अर्ज मागविले आहेत. त्‍यानुसार परदेशात उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्‍या राज्‍यातील निर्धारित राखीव प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड होणार आहे.

त्‍यासाठी अर्ज मागविले असून, विद्यार्थ्यांनी संकेतस्‍थळावरून अर्ज डाउनलोड करायचा आहे. यानतर अर्ज परिपूर्ण भरून व आवश्‍यक कागदपत्रे जोडून इतरमागास बहुजल कल्‍याण संचालनालयाचे संचालक यांच्‍या नावाने पुणे येथील पत्त्यावर पाठवायचा आहे. त्‍यासाठी ३० जूनच्‍या सायंकाळी सव्वा सहापर्यंतची मुदत आहे.

दरम्‍यान, शिष्यवृत्तीच्‍या एकूण जागांपैकी ३० टक्‍के जागा मुलींसाठी राखीव आहेत. तसेच अर्जदार विद्यार्थ्यांना अटी-शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्‍था ही जागतिक क्रमवारीत क्यूएसमध्ये दोनशेच्‍या आतील असणे आवश्‍यक आहे. याशिवाय उत्‍पन्नाची व कागदपत्रविषयक अटींचेही पालन करावे लागणार आहे.(latest marathi news)

Foreign Scholarship
Nashik Lok Sabha Constituency : ‘ये पब्लिक है, सब जानती है’; ताईंचा डायलॉग भगरेंच्या पथ्थ्यावर

विद्यार्थ्यांना योजनेचे असे होतील फायदे

योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना विविध फायदे होतील. यामध्ये विद्यापीठाने प्रमाणित केलेली शिक्षण शुल्‍काची पूर्ण रक्‍कम अदा केली जाईल. विद्यापीठाच्‍या निकषानुसार वैयक्‍तिक आरोग्‍य विमा खर्च विभागातर्फे केला जाईल.

वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्‍थेने ठरविून दिलेल्‍या किंवा केंद्र सरकारच्‍या ‘डीओपीटी’ विभागाने निर्धारित केलेल्‍या दराप्रमाणे किंवा राज्‍य शासनाने निश्‍चित केल्‍याप्रमाणे अदा केला जाईल. याशिवाय विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्‍वीरीत्‍या पूर्ण केल्‍यानंतर भारतात परतण्यासाठी नजीकच्‍या मार्गाने विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय राहणार आहे.

Foreign Scholarship
Nashik Lok Sabha Vote Counting : नाशिकची 10, तर दिंडोरीची 9 तास मतमोजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com