Nashik Accident News : स्कूल बसला अपघात

Nashik Accident : देवळाली -पाथर्डी रस्त्यावर पाथर्डी गावाजवळ असलेल्या जाधव पेट्रोलपंपाजवळ स्कूल बसला समोरून येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिल्याने चौघे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
accident
accident esakal

Nashik Accident News : गुरुवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास देवळाली -पाथर्डी रस्त्यावर पाथर्डी गावाजवळ असलेल्या जाधव पेट्रोलपंपाजवळ स्कूल बसला समोरून येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिल्याने चौघे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. शाळा सुटल्यानंतर बस (एमएच- १५- इएफ- ०६११) वडनेरकडे जात होती. (Nashik School bus accident marathi news)

त्याचवेळी समोरून (एमएच- १५- जेएम- १३६३) चारचाकीने स्कूल बसला धडक दिली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बसचे चाक तुटल्यानंतरदेखील जवळच्या शेतात बस उतरवून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. बसमधील चौघा विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या. त्याचवेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नाशिक रोड येथे जात होते. (latest Marathi News)

accident
Nashik Accident News : आंबानेर फाट्यावर पीकअपच्या धडकेत 2 ठार

त्यांनी आपले वाहन येथे थांबवून अपघाताची माहिती घेऊन संबंधित यंत्रणेला तातडीने कळविले. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना पाथर्डी फाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. चारचाकी चालकावरदेखील येथेच उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती कळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे, निरीक्षक शंकरसिंग राजपूत, नियाज शेख, कुलदीप पवार, बि. टी. गवळी यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले आणि वाहतूक सुरळीत केली. चारचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक शरमाळे यांनी दिली आहे.

accident
Nashik Accident News : अमृतधाम चौफुली येथे घंटागाडीखाली सापडून मोपेडस्वार महिला प्राध्यापिका ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com