ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या ‘वॉकेथॉन’

ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या ‘वॉकेथॉन’
Published on: 
सर्व लोगो आवश्‍यक ---- ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या ‘वॉकेथॉन’चा महाकुंभ ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’च्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतुलित, निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’ या वॉकेथॉनचे रविवारी (ता. ४) आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या नावनोंदणीसाठी नाशिक शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वय वर्षे ५० आणि त्यापुढील वयोगटाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ ऑक्टोबरला सकाळी सहा ते नऊ या वेळेत नि:शुल्क ‘वॉकेथॉन’ होणार आहे. ‘सुहाना स्वास्थ्यम’ प्रस्तुत ‘वॉकेथॉन’ होणार आहे. वॉकेथॉनमध्ये २.५ किलोमीटर अंतर असणार आहे. सर्व सहभागींसाठी झुंबा, हास्ययोग व लकी ड्रॉ असे अनेक उपक्रम असणार आहेत. वयाची पन्नाशी पार केलेल्या नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत विशेष उत्साह असून, नोंदणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक पुढे येत आहेत. ‘चला चालूया… निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या दिशेने!’ या संदेशासह नाशिककरांनी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रा. देवयानी सुहास फरांदे (आमदार, नाशिक मध्य), सोनी पैठणी नाशिक- येवला, मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल, नाशिक हे मुख्य प्रायोजक आहेत. ठक्कर्स ग्रुप लिमिटेड व वक्रतुंड हॉस्पिटल पॉवर्ड बाय स्पॉन्सर्ड आहेत. कौशल्या गॅस्ट्रो, लिव्हर ॲन्ड न्यूट्रिशन क्लिनिक, नाशिक, रायते पाटील पॅरालिसिस, रिहॅबिलिटेशन ॲन्ड आयुर्वेदा सेंटर, गोदा श्रद्धा फाउंडेशन हे असोसिएट पार्टनर आहेत. सेल्स ॲन्ड मार्केटिंग, वॉटरमेलन फूड्स ॲन्ड ब्रेव्हरेजेस प्रा. लि. ब्रेव्हरेजेस पार्टनर, क्रिएटिव माइंड एंड मीडिया सर्व्हिसेस पीपल पार्टनर, सोनी गिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड गिफ्ट पार्टनर, मातोश्री ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड ट्रॅव्हल पार्टनर यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ----- वॉकेथॉनविषयी तारीख : रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ वेळ : सकाळी ६ ते ९ अंतर : २.५ किलोमीटर स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव किंवा समर्थ जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवर भाजी मार्केट मैदान, गंगापूर रोड, नाशिक प्रवेश : निःशुल्क नोंदणीसाठी संपर्क : शरद धात्रक- ९८९००१११२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com