Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीकडून स्वतंत्र अर्ज

Teacher Constituency : महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारी (ता. ७) शक्तिप्रदर्शन करत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले.
Application
Applicationesakal

Teacher Constituency : लोकसभा निवडणुकीप्रमाणे नाशिक शिक्षक मतदारसंघातही इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारी (ता. ७) शक्तिप्रदर्शन करत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक अॅड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असताना काँग्रेसकडूनही दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. (Separate application from Congress BJP NCP in Nashik teachers constituency election)

महायुतीतील शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार यांनी, तर धनराज विसपुते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (ता. ७) शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराला स्वतंत्र एबी फॉर्म दिल्याने पक्षाकडून त्यांची उमेदवारी अधिकृत मानली जात आहे. आमदार दराडे यांनी शिवसेनेकडून, तर महेंद्र भावसार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही फाटाफूट झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अॅड. गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी मेळावा घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. (latest marathi news)

Application
Nashik Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघात साडेसोळा हजार मतदारांची भर

असे असतानाही काँग्रेसकडूनही पारोळा (जळगाव) येथील दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सूचना केल्या होत्या. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरला असल्याचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितल्याने गोंधळात आणखीच भर पडली. अर्ज मागे घेण्यासाठी बुधवार (ता. १२)पर्यंत मुदत असल्याने यापैकी कोणाची मनधरणी करण्यात कोणाला यश येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे तीन उमेदवार रिंगणात

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीचा गोंधळ सुरू असतानाच भाजपचे धनराज विसपुते, धुळ्यातील निशांत रंधे तसेच अहमदनगरमधील सुनील पंडित यांनी अर्ज दाखल केला आहे. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील आणि संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त, भारतीय जनता पक्षाचे युवानेते विवेक कोल्हे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

लोकसभेसारखाच शिक्षक मतदारसंघात गोंधळ

लोकसभा निवडणुकीत सुरवातीला हेमंत गोडसे यांचे नाव चर्चेत होते. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी उडी घेतल्याने उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरू होता. त्याचा फटका गोडसे यांना बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा तोच गोंधळ महायुतीमध्ये दिसत आहे. त्यामुळे यातून महायुती कसा मार्ग काढणार, यातील कोण कोण माघार घेणार, एकच उमेदवार राहणार की इतरही आपली दावेदारी कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Application
Nashik Teacher Constituency Election : ‘महाविकास’तर्फे गुळवेंचे नाव जवळपास निश्चित; उद्या उमेदवारीची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com