Praveen Gedam
Sakal
Seva Pakhwada Vikas Divas: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) महात्मा गांधी जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) नाशिक विभागात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
या काळात ‘पाणंद रस्ते’ आणि ‘सर्वांसाठी घरे’ हे दोन प्रमुख उपक्रम राबविले जाणार असून, प्रत्येक जिल्ह्याने स्वतंत्रपणे नावीन्यपूर्ण उपक्रमांची आखणी केली. महसूल प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या सहकार्यातून हा पंधरवडा यशस्वी करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.