Nashik News : यात्रेकरूंसाठी दानशूरांचा सेवायज्ञ! मालेगावात लोकवर्गणी काढत मेडीकल असोसिएशनतर्फे 2 दशकांची सेवा

Nashik News : सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवासाठी खानदेशातील लाखो भाविक पदयात्रेने सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असतात
Officials of the Chemist and Druggist Association bandaging and beautifying devotees with sore feet.
Officials of the Chemist and Druggist Association bandaging and beautifying devotees with sore feet.esakal

मालेगाव : सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवासाठी खानदेशातील लाखो भाविक पदयात्रेने सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असतात. पायी भाविकांना झोडगे ते आघार चौफाटा दरम्यान शेकडो दानशूर, विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी चहा, नाश्‍ता, भोजन, सरबत, ताक, फळे, बिस्कीट, पाणी आदींसह शेकडो वस्तूंचे वाटप करतात.

शहरातील मालेगाव केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा भाविकांच्या सेवेचा वसा गेल्या दोन दशकापासून सुरु आहे. असोसिएशनतर्फे लोकवर्गणी व विविध औषधे, गोळ्यांच्या माध्यमातून सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले जातात. विविध दानशूर सेवाव्रतींचा हा यज्ञ शहरापुरता सुमारे पंधरा लाखाहून अधिक खर्चाचा असतो. (Nashik 2 decades of service by Medical Association in Malegaon taking public registration)

तालुक्यातील झोडगे, दहिवाळ, देवीचा मळा, चाळीसगाव फाटा येथे भाविकांना चहा, नाश्‍ता वाटप करण्यात येत होता. संपूर्ण शहरात विविध ठिकाणी आराम व निवाऱ्यासाठी मंडपाची सोय करण्यात आली होती. जुना महामार्ग ते सोयगाव या भागातील विविध व्यापारी, संकुलांच्या तळमजल्यावर भाविक विश्रांती घेताना आढळून आले. शहरातील मेडिकल असोसिएशनने सर्व मेडिकल व होलसेलर यांच्याकडून ऐच्छिक पद्धतीने लोकवर्गणी जमा केली. यातून एक लाख ३५ हजार रुपये संकलित झाल्याचे सुरेश बागड यांनी सांगितले.

विशेष म्हणजे मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष राजू गाईड हे मुस्लीम समाजाचे असून त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. सचिव दिलीप पठाडे, चंद्रकांत महाजन, केदारनाथ तापडीया, श्री. बागड, राजेंद्र कासलीवाल व सहकाऱ्यांनी औषध कंपन्यांचे वैद्यकीय प्रतिनिधी व होलसेलर यांच्याकडून लोकवर्गणीशिवाय सॅम्पल गोळ्या, औषधी व मलम जमा केले.

रणरणत्या उन्हात पायी चालून भाविकांच्या पायाला फोड येतात. त्यांना मलम लावत ड्रेसिंग करून त्यांची सुश्रृषा करण्याचे कामही हे प्रतिनिधी करतात. प्रत्येक दुकानदार आपल्याला मिळेल तो वेळ काढून दोन ते तीन तास येथे सेवा देतो. तीन दिवसाच्या कालावधीत ठोक दराप्रमाणे तीन लाखाहून अधिक औषधी, गोळ्या, मलमचे वाटप होत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  (latest marathi news)

Officials of the Chemist and Druggist Association bandaging and beautifying devotees with sore feet.
Baramati Loksabha Constituency : बारामतीची सून तुमचे ऋण फेडणार : सुनेत्रा पवार

यात प्रामुख्याने भाविकांना ॲसिडिटी, अंगदुखी यावर गोळ्या व पेन किलर औषधी देण्यात येते. तिडीक लागू नये यासाठी सिटॉल औषधी तसेच ओआरएस पाऊच वाटप करण्यात येतात. पायाला फोड आलेल्यांना मलम लावून ड्रेसिंग करण्यासाठी मंडपात स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे.

सटाणा रस्त्यावरील मीरा इन्क्लेव्ह या व्यापारी संकुलातील गोविंद नामदेव दुसाने ज्वेलर्स, आघारकर क्लोदिंग, एमपीएसएल, हेतल मेडीकल, इमेज मिल्क पार्लर, चाय चस्का या दुकानदारांनी लोकवर्गणी करून आज दिवसभर भाविकांना पाववडा, सॅन्डवीच, आईसक्रीम कोन, चिवडा आदींचे वाटप केले. कॅम्प भागातील शिवगर्जना मित्र मंडळाने वैद्य हॉस्पीटलजवळ पालकभजी व पाववडा वाटप केले. काही चिमुकल्यांनी खाऊचे पैसे एकत्रित करून

बिस्कीट बॉक्स खरेदी करत त्याचे वाटप केले. स्पंदन फाऊंडेशनसह विविध महिला स्वयंसेवी संस्थाही यात अग्रभागी होत्या. सेवाव्रतींच्या या यज्ञाने गडावरील भाविक तृप्त झाले होते. याशिवाय गुरुदेव भक्त मंडळाचा भोजन महाप्रसादाचा यज्ञ गेली चार दशके सुरु आहे. त्याचा खर्च वेगळाच आहे.

Officials of the Chemist and Druggist Association bandaging and beautifying devotees with sore feet.
Nashik Mission Har Ghar Jal: डोक्‍यावरील हंड्याचा भार झाला हलका! ‘मिशन हर घर जल 2024’ अंतर्गत उंडोहळला रोलिंग ड्रम वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com