Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला शिक्षण विभागाचा ‘खो’; चार जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत बैठक; संशयितांच्या कागदपत्रांसाठी तातडीची नोटीस

Nashik Crime Branch Steps Up Shalarth ID Scam Investigation: नाशिकसह चार जिल्ह्यांतील शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला गती देण्यासाठी गुन्हे शाखेने शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Shalarth ID Scam

Shalarth ID Scam

esakal

Updated on

नाशिक: राज्यभर गाजत असलेल्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला शिक्षण विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाशिक शहर गुन्हे शाखेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत बैठक घेऊन पोलिसांनी त्यांची कानउघाडणी केली. संशयित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित कागदपत्रे तातडीने तपासासाठी सादर करण्याचे निर्देश देत संबंधित अधिकाऱ्यांना रीतसर नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com