Nashik Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार! शिवनाद ढोलपथकाने वाढविली मुख्य मिरवणुकीची रंगत

Shiv Jayanti 2024 : शहरातील मुख्य शिवजयंती मिरवणुकीला सोमवारी (ता.१९) सायंकाळी साडेपाच वाजता प्रारंभ झाला
Nashik Shiv Jayanti 2024
Nashik Shiv Jayanti 2024esakal

Nashik Shiv Jayanti 2024 : शहरातील मुख्य शिवजयंती मिरवणुकीला सोमवारी (ता.१९) सायंकाळी साडेपाच वाजता प्रारंभ झाला. पालकमंत्री दादा भुसे यांनी नारळ वाढविल्यावर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव काही काळ ढोलच्या तालावर ठेकाही धरला. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या शिवनाद वाद्य पथकाने मिरवणुकीची शोभा वाढविली. (Nashik Shiv Jayanti 2024 marathi news)

शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीसाठी पालकमंत्री दादा भुसे साडेचारच्या सुमारास वाकडी बारव येथे दाखल झाले. या वेळी या ठिकाणी चेतन शेलार यांचे छत्रपती सेना हे एकच मंडळ हजर होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पालकमंत्र्यांनी नारळ वाढवत मिरवणुकीचा श्रीगणेशा केला.

मिरवणुकीसाठी पाच मंडळांनी पोलिसांची परवानगी घेतली होती, मात्र साडेपाच वाजले तरी उर्वरित चार मंडळांचे देखावे वाकडी बारव येथे हजर झालेले नव्हते. त्यामुळे हजर असलेल्या एकमेव मंडळाची मिरवणूक सुरू झाली. या वेळी पालकमंत्र्यांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, अर्जुन टिळे, प्रवीण जाधव असे मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साडेपाचच्या सुमारास शिवसेना नेते सुनील बागूल व अन्यजण मिरवणुकीत सहभागी झाले. शहरासह उपनगरांत शिवजयंतीचा यंदा मोठा असताना बहुसंख्य मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. मिरवणुकीत कोणतीही अडचण नको म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने भद्रकालीसह मेनरोडवरील अतिक्रमणे कालच हटविली होती.

Nashik Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024 : पोवाडा, नृत्य, नाट्यातून उमवित शिवरायांना वंदन

युवक-युवतींचा सहभाग

मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या छत्रपती सेनेच्या मंडळात सहभागी शिवनाद वाद्य पथकाने मिरवणुकीची रंगत वाढविली. या पथकातील एकशेवीस युवक-युवतींचा सहभाग होता. मिरवणुकीचे वाटेत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वाकडी बारव येथून सुरू होणाऱ्या मिरवणुकीकडे शहरातील बहुसंख्य मंडळांनी पाठ फिरविल्याने उत्साहाचा अभाव होता.

मिरवणुकीत छत्रपती सेना, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, जुन्या नाशिकमधील जाणता राजा मित्रमंडळ, द्वारका परिसरातील अर्जुन क्रीडा मंडळ अशा चारच मंडळांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मिरवणूक सुरू झाल्यावर अवघे एक मंडळ सहभागी झाले. बाकीचे मंडळ साडेपाचनंतर सहभागी झाले.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अवघे शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी चौकाचौकात उभारलेल्या छत्रपती जयंतीतून इच्छुकांनी नाशिककरांशी थेट संवाद साधला. शहरासह विविध उपनगरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांत अभूतपूर्व उत्साह होता.

शिवजयंतीनिमित्त चौकाचौकात कार्यकर्त्यांत मोठा उत्साह जाणवला. यात युवकांबरोबरच मोठ्या प्रमाणावर युवतीही सहभागी झाल्या होत्या. चौकाचौकात उभारलेले भगवे ध्वज, पताका, तोरणांनी जणू शिवसृष्टीचीच अनुभूती जाणवत होती. चौकाचौकात उभारलेले भव्य देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळली होती.

शिवजयंतीचे औचित्य साधत विविध मंडळातर्फे रक्तदान, नेत्रतपासणी, मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. पंचवटीतील मालेगाव स्टॅन्ड व पंचवटी कारंजावरील मुख्य शिवजयंती सोहळ्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळली होती. (Latest Marathi News)

Nashik Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti : भंडारा डोंगरावर भक्ती-शक्तीचा संगम ; माघ शुद्ध दशमी-शिवजयंतीनिमित्त राज्यातील दीड लाख भाविकांची वारी रुजू

अशोक स्तंभ मित्रमंडळाने उभारलेला शिवप्रतिमेचा ६५ फुटी देखाव्यासह छत्रपती सेनेच्या होन प्रदर्शनासही बालगोपालांसह ज्येष्ठांनी भेट दिली. याशिवाय काही मंडळांनी चिमुरड्यांची किल्ले बनविण्याची स्पर्धाही आयोजित केली होती, तिलाही मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय शहरातील विविध शाळांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

घरोघरी भगवे वातावरण

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे घरोघर पूजन करण्यात आले. अनेकांनी कालपासूनच घरांवर विद्युत रोषणाई केली होती. याशिवाय अनेकांनी दुचाकीला मोठा ध्वज लावल्याने शहरात चांगलीच वातावरण निर्मिती झाली होती. चौकाचौकात उघडण्यात आलेल्या स्टॉल्सवर छत्रपतींच्या छोट्या पुतळ्यावर भगवे ध्वज, पताका यांना मोठी मागणी होती. (Latest Marathi News)

Nashik Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024 : अवघे वातावरण झाले शिवमय ; भव्य सोहळ्यात ९५ स्वराज्यरथांचा सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com