नाशिक : श्रीराम, सीता शिल्पाचे दर्शन दुरूनच 
जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटकांची नाराजी

नाशिक : श्रीराम, सीता शिल्पाचे दर्शन दुरूनच जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटकांची नाराजी

तपोवनातील उद्यानासह नदीकिनारी मोठी गर्दी उसळत आहे.

पंचवटी : हिवाळ्याची(winter) चाहूल लागल्याने गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी तपोवनात स्थानिकांसह बाहेरून आलेल्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, गोदेच्या काठावरील राम(shriram), लक्ष्मण(lakshman) व सीतेच्या(sita) शिल्पाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यंटक, भाविकांचा हिरमोड होत आहे.

नाशिकचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व मोठे असल्याने याठिकाणी वर्षभर देशभरातील पर्यटक भाविकांचा मोठी गर्दी असते. आता थंडी सुरू झाली असून, नाशिकच्या(nashik) गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी व निसर्ग सौदर्य न्याहाळण्यासाठी तपोवनात गर्दी उसळत आहे. त्यामुळे तपोवनातील उद्यानासह नदीकिनारी मोठी गर्दी उसळत आहे.

नाशिक : श्रीराम, सीता शिल्पाचे दर्शन दुरूनच 
जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटकांची नाराजी
शीना बोरा जिवंत! इंद्राणी मुखर्जीने पत्रातून केला धक्कादायक दावा

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी नदीच्या उजव्या तटावरील उंच टेकडीवर श्रीराम, सीता व लक्ष्मण यांचे लोखंडी शिल्प उभारण्यात आले. या शिल्पाकडे जाण्यासाठी गोदावरीच्या(godawari river) डाव्या तटावरून आकर्षक पुलाची उभारणी करण्यात आली होती.

परंतु, महापूर(flood) व अन्य कारणाने हा पूर धोकादायक बनल्याने संबंधितांना तो काढून दुरुस्तीसाठी पाठवून दिला होता. मात्र, मोठा काळ लोटूनही या पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नसल्याने पर्यटकांना शिल्पाकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे पर्यटकांना दुरूनच या शिल्पाकडे पाहण्याचे समाधान लाभत आहे.

नाशिक : श्रीराम, सीता शिल्पाचे दर्शन दुरूनच 
जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटकांची नाराजी
ओबीसी आरक्षणाला धक्का, इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

उड्या मारून शिल्पाकडे

सध्या शिल्पाकडे जाणारा लोखंडी पूर काढून टाकल्याने सहकुटुंब आलेले पर्यंटक दुरूनच शिल्प पाहण्याचा आनंद घेतात. मात्र, काही तरुण नदीपात्रातील खडकावरून उड्या मारून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लहान मोठे अपघातही होत असल्याकडे तपोवनातील व्यावसायिकांनी लक्ष वेधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com