नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू- संत व भाविकांबरोबरच महत्त्वाच्या व्यक्ती कुंभस्नानासाठी येणार असल्याने नाशिकचे रामतीर्थ व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताजवळ हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार आहे. त्या संदर्भात कुंभमेळा प्राधिकरण समितीने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेला सूचना दिल्या आहेत.