Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती व शिखर समितीची स्थापना; नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
Girish Mahajan to Lead Ministerial Committee, While CM Devendra Fadnavis Chairs the Apex Committee: या समितीत छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल यांना स्थान देण्यात आले आहे.
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अखेर कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना करण्यात आली आहे. महायुतीतील नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या समिती स्थापनेमागे असल्याचे दिसून येत आहे.