

संपत ढोली
सिन्नर तालुक्यातील शिवड़े येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात जेवण करत असताना गोरख लक्ष्मण जाधव (४३) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या व शेतकऱ्यात झटापट होवून दोघेही जवळच्या विहिरीत पडले. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.