Nashik Sinnar Politics: सिन्नरच्या राजकारणात कोणते डाव कधी घडतात याकडे नजरा!

Sinnal Assembly Constitution Map
Sinnal Assembly Constitution Mapesakal

"सिन्नर तालुक्यातील मतदारसंघात आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघांचीही अनेक संस्थेमध्ये सत्ता आहे. राष्ट्रवादीकडून आमदार कोकाटे यांनी तालुक्यात उमेदवारी करून राष्ट्रवादीचा झेंडा हा तालुक्यात फडकविला. त्यातच मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागला. आमदार कोकाटे यांनी मुंबई येथील बैठकीत उपस्थितीत दर्शवून अजितदादा पवार यांना आपला पाठिंबा दिला असल्याचे संकेत मंगळवारी दिले. सिन्नर तालुका हा तसा राष्ट्रवादीच्या मागे अनेक वर्षांपासून उभा असून, शरद पवार यांचे विश्वासू असलेले दिवंगत सूर्यभान गडाख यांना अनेक वर्ष पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचा सहवास लाभला. त्यामुळे गडाख कुटुंबीयांचे व पवार कुटुंब यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे. कोकाटे यांच्या तालुक्यात पक्ष अध्यक्ष शरद पवारांसाठी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी पुढे आले असून, अजून शरद पवार यांच्यासाठी कोण कोण पुढे येते, हे पाहणेही खूप महत्त्वाचे आहे." - प्रशांत कोतकर, नाशिक

(Nashik Sinnar Political rivalry)

राज्यातील पहिली सभा ही नाशिक जिल्ह्यात घेण्याचे शरद पवार यांनी सांगितल्याने सिन्नर तालुक्यातील अनेक जुने जाणत्या पदाधिकाऱ्यांना तालुक्यात मेळावा घेण्याचेही सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.

राजकारणात काहीही घडू शकते, हे आजच्या घडामोडीवरून दिसत असल्याने शरद पवार सिन्नर तालुक्यात कोणा कोणाला भेटता, हे पाहणे आता औचित्याचे आहे. रविवारी आमदार कोकाटे यांनी संवाद मेळावा शहरात ठेवलेला असून, त्यांच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

तसेच शिवसेनेचे माजी आमदार वाजे यांचे तालुक्यात अनेक ठिकाणी वर्चस्व असून, त्यांच्या भूमिकेकडेही वरिष्ठ नेत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. माजी आमदार वाजे व उदय सांगळे यांचा गट सिन्नर तालुक्यात सक्रिय झाल्याने कोकाटे विरुद्ध वाजे, असे समीकरण अनेक दिवसांपासून दिसत होते.

पण आता राजकीय घडामोडी घडल्याने भाजपचे जयंत आव्हाड, तसेच काँग्रेसचे विनायक सांगळे यांची भूमिकाही तालुक्यात खूप महत्त्वाची असेल.

त्यात राजकीय वलय असलेले माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख तथा दिवंगत नानासाहेब गडाख यांचे चिरंजीव हेही तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक अशा विविध स्तरांवर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.

त्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय विश्वासू व्यक्ती मानले जातात. त्यात त्यांचे चिरंजीव अभिषेक गडाख यांनीही विद्यार्थिदशेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदे भूषविले असून, त्यांच्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांची विचारसरणी असून, अनेक आंदोलने तसेच सामाजिक कामात त्यांनी आपली छाप तयार केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sinnal Assembly Constitution Map
Sharad Pawar Latest Update : मोठ्या साहेबांची सभा नव्या राजकीय समीकरणांची नांदी! सभेला शिवसेनेचे हे आमदारही सरसावले

विजय सूर्यभान गडाख हे माजी पंचायत समिती सदस्य असून, सर्व गडाख कुटुंबीय हे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सोबत मागील अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे गडाख कुटुंब यांचे तालुक्यात तेवढेच राजकीय वलय असल्याने त्यांची भूमिकाही खूप महत्त्वाची तालुक्याच्या राजकारणासाठी मानली जाते.

वाजे कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची

प्रकाशभाऊ वाजे व शरद पवार यांचे अतिशय कौटुंबिक जवळीक संबंध असून, फार वर्षांपूर्वी प्रकाशभाऊ वाजे यांच्याकडे तिकीट देऊन शरद पवार यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता.

वाजे कुटुंबीय यांची भूमिका तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाजपचे जयंत आव्हाड हे सिन्नर तालुका मतदारसंघप्रमुख असल्याने ते भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असू शकतात.

यासाठी भाजपचे पदाधिकारी व पक्षाचे तालुक्यासाठी पुढचे काय पाऊल असेल, हे बघणेसुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

Sinnal Assembly Constitution Map
NCP Ajit Pawar : नरडाण्यात शरद पवार समर्थकांचे आंदोलन; अजित पवारांचा निषेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com