

सिडको : अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या संशयित चोरट्याला अंबड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ घरफोड्यांची उकल झाली आहे. यात अंबड पोलिसांनी तब्बल साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पत्रकार परिषदेत अंबड पोलिसांनी दिली. संशयिताचे नाव फारुक रजाक काकर (वय ४८, रा. भद्रकाली, मूळगाव, जळगाव पाचोरा) असे आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४ या चालू वर्षात विविध घरफोडीचे गुन्हे दाखल होते. (Solved 8th house burglaries in Ambad locality and seized goods worth thirteen lakhs from suspect )
त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावत यांच्या पथकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता. पथकाचे मयूर पवार व समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित फारुख काकर याला भद्रकाली परिसरातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने अंबडच्या वेगवेगळ्या भागातून आठ ठिकाणी घरफोडीची कबुली दिली.
त्याच्याकडून १८८ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५६ ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण १३ लाख ५४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट, झनकसिंग गुनावत, किरण रौंदले, समाधान शिंदे, मयूर पवार, कुणाल राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, मते, निकम, पाटील, बारगजे आदींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.