Nashik NMC News : मानधनावर डॉक्टर नियुक्तीला मान्यता

Nashik NMC : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४२ डॉक्टर मानधनावर भरण्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
Doctors
Doctorsesakal

Nashik NMC News : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४२ डॉक्टर मानधनावर भरण्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मंजुरी देताना वैद्यकशास्त्र, स्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ व त्वचारोग तज्ज्ञांच्या मानधनात ३५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महापालिकेच्या तीन शहरात पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य केंद्र चालविले जातात. (Nashik Standing Committee approved proposal of Medical Department to pay doctors on emoluments in municipal hospitals)

नव्याने १०५ दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून आरोग्य सेवेवर मोठा ताण येत आहे. तर दुसरीकडे महापालिकेत अन्य पदासह डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागात विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची सध्या १८९ पदे मंजूर आहेत.

त्यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४२ पदे सहा महिन्यांसाठी मानधनावर भरण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शासनाकडून महापालिकेच्या भरतीला परवानगी दिली होती. त्याअंतर्गत जवळपास ८४ डॉक्टर भरले जाणार होते. (latest marathi news)

Doctors
Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

परंतु, ही प्रक्रियादेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी नव्याने ४२ पदे मानधनावर भरली जाणार आहे. या मानधनावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ७५ हजारापर्यंत मासिक वेतन होते.

त्यात आता ३५ हजार रुपयांनी वाढ करत १ लाख दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. वैद्यकशास्त्र, स्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ व त्वचारोग तज्ज्ञांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. ३ कोटी ७५ लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

Doctors
Crime News: कामावरुन आलेल्या पतीला जेवण देण्यास पत्नीने केला उशीर अन् गेले दोन जीव; वाचा धक्कादायक घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com