Nashik Stray Dog News : मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला! भटकी कुत्री नरहरीनगर परिसरात सोडली जात असल्याचा नागरिकांचा आरोप

Nashik News : पाथर्डी फाटा भागातील नरहरीनगर परिसरात मंगळवारी (ता. ७) मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बालके जखमी झाले आहे.
Stray Dog (file photo)
Stray Dog (file photo)esakal

इंदिरानगर : पाथर्डी फाटा भागातील नरहरीनगर परिसरात मंगळवारी (ता. ७) मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बालके जखमी झाले आहे. आसपासच्या नागरिकांनी त्यांची सुटका केल्याने बालके थोडक्यात वाचली. एका कुत्र्याने सकाळीच एका वासराला देखील चावल्याचे नागरिकांनी सांगितले. (Nashik Stray Dog)

निर्बीजीकरण केलेले, तसेच शहराच्या इतर भागातून पकडून आणलेली भटकी कुत्री या भागात सोडली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. कोपरगाव येथून स्वराज दीक्षित (वय ६)हा चिमुरडा त्याच्या आजी मीना दीक्षित यांच्या सोबत तुळसाई रो-हाउस येथे राहणाऱ्या त्याच्या आत्याकडे आला होता.

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तो घराबाहेर खेळत असताना त्यांच्यावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. स्वराजने आरडाओरडा केल्याने त्याच्या आजीने, तसेच शेजारील नागरिकांनी धाव घेतली. कुत्री त्याला फरपटत नेत असताना त्याची सुटका करण्यात आली. कुत्र्यांनी त्याला हाता-पायावर पाठीवर चावा घेतला.

त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. सायंकाळपर्यंत लहान बालकांना पालकांनी घरातच कोंडून ठेवले. ही घटना ताजी असतानाच रात्री दहाच्या सुमारास गोडसे दांपत्य आपली तीन वर्षांची मुलगी कस्तुरी हिच्यासह शतपावली करत असताना मागून आलेल्या एका कुत्र्याने तिच्या डोक्यावर झेप घेतली आणि मागून आलेल्या तीन ते चार कुत्र्यांनी देखील तिच्यावर हल्ला केला. (latest marathi news)

Stray Dog (file photo)
Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

तिला वाचवत असताना तिच्या आईला देखील कुत्र्यांनी चावले. कस्तुरीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक या मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून, तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

"यापूर्वी देखील शेजारी काम करणाऱ्या एका वॉचमनला कुत्र्याने चावले आहे. आज सकाळी एका वासरूवर देखील कुत्र्याने हल्ला केला आहे. तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे." - रमेश जगताप, (स्थानिक)

"नातवाला पाच ते सहा कुत्र्यांनी घेरलेले बघून अंगाचा थरकाप झाला. आजूबाजूचे धावून आल्याने त्याची कशीबशी सुटका झाली आणि त्याचा जीव वाचला." - मीना दीक्षित (बालकाची आजी)

"या हल्ल्यात या बालकांचे बरंवाईट झाले असते तर जबाबदार कोण? या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे. अन्यथा आम्ही उपोषण करू." - अलका जाधव (स्थानिक)

Stray Dog (file photo)
Nashik Unseasonal rain News : वणी परिसरात तासभर अवकाळी; उघड्यावरील कांद्याचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com