Nashik Crime Rate Hike: ‘स्ट्रीट क्राईम’ थांबेना; पोलिस ‘ॲक्शन मोड’वर येईना! पोलिसांच्या झिरो टॉलरन्सला गुन्हेगारांकडून छेद

Crime News : टवाळखोर चॉपर, लोखंडी रॉडचा वापर करीत सर्रासपणे समोरच्याला गंभीर इजा पोहोचवित असून, पोलिस केवळ गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडत आहेत.
Crime
Crime esakal

Nashik Crime Rate Hike : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, शहरातील स्ट्रीट क्राईमविरोधात पोलिसांनी मोहीम उघडलेली असतानाही, मारहाणीच्या घटना थांबलेल्या नाहीत. उलटपक्षी, दिवसेंदिवस अशा घटना सातत्याने वाढत असल्याने पोलीस टवाळखोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात ॲक्शन मोडमध्ये कधी येणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

टवाळखोर चॉपर, लोखंडी रॉडचा वापर करीत सर्रासपणे समोरच्याला गंभीर इजा पोहोचवित असून, पोलिस केवळ गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी तीव्र नाराजी आहे. (Nashik Street Crime Unstoppable police not action mode)

पहिली घटना...

फुलेनगर येथे तिघांनी एकाला शिवीगाळ व मारहाण केल्यानंतर एकाने त्याच्याकडील चॉपरने वार करून जखमी केले. छोटू रामसुरत चव्हाण (रा. फुलेनगर, पंचवटी. मूळ रा. फैजाबाद, उत्तरप्रदेश) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो कटिंग करण्यासाठी दुकानाजवळ आला.

त्यावेळी संशयित गणेश माने व त्याचे दोन साथीदार यांनी काहीएक कारण नसताना त्यास शिवीगाळी, मारहाण करीत एकाने चॉपरने त्याच्या पायावर वार करून जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना...

सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये संशयितांनी कुरापत काढून एकाला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. मंगेश रमेश भालके (१८, रा. उत्तमनगर, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील गार्डनजवळ संशयित प्रमोद सातपुते, त्याचे वडील, त्याचे मित्र हर्षल, सिद्धांत यांनी मंगेशला, ‘तू आमच्या गल्लीत सारखा का फिरतो’ अशी कुरापत काढन बेदम मारहाण केली. तसेच, त्याच्या डोक्यात काहीतरी मारून डोके फोडले. यावेळी संशयितांनी पुन्हा गल्लीत दिसला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना ...

सिडकोतील सह्याद्रीनगर येथे लहान बाळाला सफरचंद मारल्याचा जाब विचारला असता संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तर समजवण्यासाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून दुखापत केली. चंद्रकांत सावळाराम पाटोळे (रा. घरकुल योजना, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ८) रात्री साडेसातच्या सुमारास सदरचा प्रकार घडला असून, संशयित आशिष गेवांदे, त्याची पत्नी, संदीप गेवांदे यांच्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Crime
Crime : पुणे हादरले, सख्या मावस बहिणींवर ४ जणांनी केला सामूहिक अत्याचार

चौथी घटना ...

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत वाद सुरू असताना दाम्पत्य तो सोडविण्यासाठी गेले असता, संशयितांनी लोखंडी पाइपाने मारून दुखापत केली. रहेमान शेख (रा. बागुलनगर, विहितगाव), विक्की बाबा असे संशयितांची नावे आहेत. सोनिका माधव काळे (रा. पिंपळे सदन, गोसावीवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलीशी संशयित वाद घालत होते.

त्यावेळी सोनिका व त्यांचे पती वाद सोडविण्यासाठी गेले असता, संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत लोखंडी रॉड माधव काळे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. तर, सोनिका काळे यांच्या पोटात एकाने लाथ मारली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑलआऊट- कोम्बिंगची गरज

शहर पोलिसांकडून सातत्याने टवाळखोर आणि सराईत गुन्हेगारांविरोधात ऑल आऊट आणि कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्याची मागणी केली जाते. परंतु पोलिसांकडून अशा मोहीमा होत नसल्याने स्लम परिसरात टवाळखोरांकडून क्षुल्लक कारणावरून चॉपर वा लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यानेच हाणामारीच्या घटना शहरात वाढल्याचे बोलले जाते

Crime
Nagpur Crime News : ‘ती’ वाईट आहे म्हणताच बादलवर केले सपासप वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com