Nashik Water Crisis : पाणीटंचाईच्या निषेधार्थ लासलगावकरांचा कडकडीत बंद

Nashik News : शहरासह लाभार्थी गावांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे संतप्त लासलगावकरांनी शनिवारी (ता.११) बंदला १०० टक्के पाठिंबा दिला.
Lasalgaon shutdown supported by citizens along with professionals over water issue
Lasalgaon shutdown supported by citizens along with professionals over water issueesakal

लासलगाव : शहरासह लाभार्थी गावांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे संतप्त लासलगावकरांनी शनिवारी (ता.११) बंदला १०० टक्के पाठिंबा दिला. लासलगाव व आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून सातत्याने होणारी पाणीगळती, नांदूरमध्यमेशवर धरणातील कमी झालेला पाणीसाठा, मोटार नादुरुस्त होणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे. (Strict shutdown of Lasalgaon residents in protest of water shortage)

वीज बिलापोटीची थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित करणे अशा अनेक समस्येमुळे मागील २२ दिवसांपासून लासलगावकर पाण्यापासून वंचित होते. लहान मुले, महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतप्त नागरिकांसह गावातील सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे आपापली आस्थापना बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला.

प्रशासनाची धावपळ

भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लासलगावकरांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही.

काही भागात पाणीपुरवठा

भीषण पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या लासलगावला अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने प्रशासनाने नागरिकांचा रोष पाहता वालदेवी, मुकणे व दारणातून पाणी सोडून लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडले. शनिवारी (ता.११) शहरातील काही भागात दुपारनंतर पाणीपुरवठा करण्यात आला. (latest marathi news)

Lasalgaon shutdown supported by citizens along with professionals over water issue
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

"पाणी प्रश्नाच्या निषेधार्थ आम्ही लासलगाव शहर समिती व नागरिक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहे." - दत्ता पाटील, लासलगाव

"चुकीच्या नियोजनाचा फटका हा लासलगाव व येथील रहिवाशांना बसत आहे. याच्याच निषेधार्थ आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. १७ कोटी रुपये खर्च केलेली पाइपलाइन अवघ्या सहा महिन्यात फुटत असल्याने या कामाची चौकशी व्हावी." - विकास कोल्हे, ग्रामस्थ

"करोडो रुपयांचा खर्च नवीन पाइपलाइनसाठी केला तरी ग्रामस्थांना वीस वीस दिवस पाणी येत नाही. त्यामुळे या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी व्हावी." - राजू कराड, सामाजिक कार्यकर्ते

"गावचा पाणी प्रश्न गंभीर आहे. अनेकदा काम सोडून पाण्यासाठी वेळ द्याव लागत आहे. यामुळे कामावर देखील ताण पडतो. आर्थिक गणित बिघडतात." -मुन्ना फिटर, लासलगाव.

Lasalgaon shutdown supported by citizens along with professionals over water issue
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

"गावात भीषण पाणीटंचाई आहे. घरात कमावते कोणी नाही. बाजारात मटकी विकण्याचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायावर घर चालते. व्यवसायातून आलेला अधिकचा पैसा पाण्यावर खर्च होतो. पाणीटंचाईमुळे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च कसा करणार व पोटाला खाणार काय." - सीमा भागवत, छोट्या व्यावसायिका

"गेल्या १७ ते १८ वर्षांपासून लासलगाव पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. जवळपास २० दिवस झाले तरी पिण्यासाठी पाणी येत नाही.धरण उशाला कोरड घशाला अशी आमची अवस्था झाली आहे. आज नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले आहे. यावर कायमस्वरूपी उपाय निघाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल."- स्मिता कुलकर्णी, गृहिणी

प्रॉपर्टीचे व्यवहार ठप्प

गेल्या अनेक वर्षापासून लासगावकरांचा पाणी प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे यामुळे परिसरातील प्रॉपर्टी, प्लॉट, बंगले, फ्लॅट, रो हाऊस याचे व्यवहार ठप्प झाले आहे. शिवाय वारंवार लासलगाव बाजार समितीचे बंदमुळे स्थानिक व्यापारावर मोठा परिणाम झालेला आहे.

Lasalgaon shutdown supported by citizens along with professionals over water issue
Nashik Crime News : मालेगाव मच्छीबाजार भागातील गोळीबाराला अवैध धंद्यातील वादाची किनार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com