Nashik Talathi Success Story : मजुराच्या मुलाची तलाठी पदाला गवसणी! जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वासाच्या जोरावर मिळविले यश

Nashik News : आयुष्यात काही तरी करण्याची जिद्द, प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर ओझर (ता. निफाड) येथील मजुराच्या मुलाने तलाठी पदाला गवसणी घातली
Abhijit Garud
Abhijit Garudesakal

कोकणगाव : आयुष्यात काही तरी करण्याची जिद्द, प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर ओझर (ता. निफाड) येथील मजुराच्या मुलाने तलाठी पदाला गवसणी घातली. दोन दिवसांपूर्वी तलाठी पदाचा निकाल लागला. त्यामध्ये ओझर येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अभिजितने गरुडने तलाठी परिक्षेत यश मिळवले. (Nashik Success Story Laborer son Talathi post at ozar marathi news)

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मूळ नगर जिल्ह्यातील संजय गरुड आणि त्याचे कुटुंब ओझरमध्ये वास्तवास आहे. दोन एकर शेती मात्र दुष्काळ, उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने त्यांनी ओझर गाठले आणि मिळेल ते काम करु लागले. गरीब परिस्थिती असल्याने अभिजितने देखील कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करु लागला. त्यास ओझर येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघात केमिस्ट म्हणून नोकरी लागली. परंतु, तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने नोकरी सोडली. त्यानंतर अभिजितने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले.

आयुष्यात अधिकारी व्हायचेच असा निश्चय त्याने केला. पण, परिस्थिती साथ देत नव्हती. त्यातच क्लास लावण्यासाठी पैसेही नव्हते. म्हणून घरीच अभ्यास करु लागला. अभिजितची परिस्थिती लक्षात घेत ओझर येथील अभ्यासिकेतील सर्व मित्र परिवाराने त्यास वेळोवेळी मदत केली. यानंतर त्याने तलाठीसाठी अर्ज केला. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात अभिजित यास २०० पैकी १९५ गुण मिळाले. (latest marathi news)

Abhijit Garud
Success Story : शेतकरी कुटुंबातील दोन उज्वलांचे स्पर्धा परीक्षेत उज्वल यश

अभिजितचे पहिली ते दहावी शिक्षण चिंचोडी येथे झाले. विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पाथर्डी तालुक्यातील आदीनाथनगरमधील दादा पाटील महाविद्यालयात पूर्ण केले. तलाठी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी अभिजीतची आरोग्य विभागात निवड झाली होती. आरोग्य विभागात रुजू होणार तोच त्याची तलाठी म्हणून निवड झाली. निकाल समजल्यावर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

२०२३ ला पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा दिली असून, त्याचा निकाल बाकी आहे. यासह कर सहाय्यक २०२३ मुख्य परीक्षा, मंत्रायलयात लिपिक २०२३ पदाच्या मुख्य परीक्षा दिल्या त्यांचाही निकाल अद्याप बाकी आहे.

"मागील काही वर्षापासून सुरु असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना, आता यश मिळत असल्याने मनोमन समाधान मिळत आहे. मात्र मागे वळून बघितले तर अंगावर काटा उभा राहतो. माझ्या यशात सर्व कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक व अभ्यासिकेतील सर्व मित्र यांनी सतत मदत केली. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी जिद्द ,सातत्य, चिकाटी, प्रयत्न गरजेचे असते."

- अभिजित गरुड, ओझर

Abhijit Garud
Success Story : वडील गेले; मात्र त्यांचे स्वप्न मुलीकडून पूर्ण; दुय्यम निबंधक परीक्षेत यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com