नाशिक साखर कारखान्याकडे १७ कोटी थकीत

नाशिक साखर कारखान्याकडे १७ कोटी थकीत
Published on: 
फोटो : H32652 नाशिक : सहकारी साखर कारखान्याबाबत साखर आयुक्तांना निवेदन देताना अनिल घनवट, अनिल ढिकले, शंकरराव ढिकले, जयराम ढिकले, दत्ता ढिकले. … नाशिक साखर कारखान्याकडे १७ कोटी थकीत राजगंगा शुगर मिल्सच्या चौकशीची मागणी; राज्यातील इतर व्यवहार थांबविण्याचे निवेदन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : शेतकऱ्यांनी नाशिक सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या उसाचे पैसे त्यांना मिळालेले नाही. तसेच कामगारांचे देणी आणि इतर थकबाकीचे एकूण १७ कोटी रुपये थकीत आहेत. कारखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या राजगंगा शुगर मिल्सने येथून पळ काढला असून त्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे केली. ‘नासाका’च्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६)राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानुसार पळसे येथील ऊसबिले, कामगारांची देणी व नाशिक सहकारी साखर कारखाना, पळसे येथील थकीत ऊसबिले, कामगारांची देणी व इतर थकबाकीचे १७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी हा कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतली, तेव्हा शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळाले. पण अष्टलक्ष्मी इथेनॉल एनर्जी लि. आणि राजगंगा शुगर मिल्स प्रायव्हेट लि. पुणे यांच्यामध्ये करार झाल्यानंतर सर्व अधिकार राजगंगा शुगर मिल्सचे संचालक राजाराम घावटे, प्रसाद घावटे, विठ्ठल कदम यांना देण्यात आले. २०२५-२६च्या गाळप हंगामातील संपूर्ण पैशांची हमी राजगंगा शुगर मिल्स यांनी घेतल्यानंतर कारखान्यातील संपूर्ण साखर, भुसा, राख विक्री करून कारखाना बंद केला आणि शेतकऱ्यांची थकीत बिले अदा न करता पलायन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. राजगंगा शुगर मिल्सने राज्यातील इतर कारखाने चालविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांची चौकशी करून नाशिकच्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे अदा करण्याची मागणी या शेतकऱ्यानी साखर आयुक्तांकडे केली. या वेळी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, शेतकरी संघटनेचे शंकरराव ढिकले, नाशिक तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती जयराम ढिकले, माजी सभापती दत्ता ढिकले आदी उपस्थित होते. ---चौकट धाराशिवच्या व्यवहारांची चौकशी करा ‘नासाका’ चालवण्याची जबाबदारी असलेले राजाराम घावटे, प्रसाद घावटे आणि विठ्ठल कदम यांची चौकशी होणे आवश्यक आहे. उपलब्ध कागदपत्रे व पुराव्यांच्या आधारे त्यांची जबाबदारी निश्चित करून अनियमितता किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच संबंधित व्यक्तींनी धाराशिव जिल्ह्यातील बानगंगा सहकारी साखर व भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेतल्याची माहिती मिळते. येथील व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com