
निफाड : संपूर्ण जिल्हाभरात निफाड तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. मात्र अडचणींचा डोंगर संपता संपत नाही, तर दुसरीकडे उसाची लागवड करा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत असताना उसाची शेतीच नको, या निर्णयापर्यंत निफाड तालुक्यातला शेतकरी येऊन पोचला आहे. पिकविलेल्या ऊस तोडून नेण्यासाठी व्यवस्थेची मिन्नतवारी करण्याची वेळ आल्याने ऊस उत्पादक हवालदिल झाला आहे.