
चांदोरी : थंडीतही पहाटे पाचला उठून स्वयंपाक करत पतीससोबत उसाच्या फडात जायचं, दिवसभर ऊस तोडायचा, त्याच्या मोळ्या बांधून रात्री-बेरात्री कडाक्याच्या थंडीत वाहने भरायची. एवढं करूनही रस्त्यावरून जाताना उसाने भरलेली वाहने पडतात, तेव्हा मात्र ऊसतोडणी मजुरांचा संघर्ष जीवनाच्या शिखरावर जाऊन पोचतो. उसाच्या फडात उभारलेल्या कोप्या म्हणजेच त्यांचं घर... त्याच घरात सहा महिने त्यांचा संसार चालतो.