Nashik Summer Heat : कडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा 42 अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

Nashik News : जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाने अनेकजण आजारी पडत आहेत. यात तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे
Summer Heat
Summer Heatesakal

Nashik Summer Heat : शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून सूर्यदेव आग ओकत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव सुरु आहेत. लग्न सोहळ्यांची धूम वऱ्हाडींचा घाम काढत आहे. अनेकांना नाईलाजाने का होईना उन्हात जाणे भाग पडत आहे. पारा ४२ अंशाच्या आसपास आहे. कडाक्याचे ऊन डोक्यावर झेलत नागरीकांना लग्नसोहळ्यांना हजेरी लावावी लागत आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाने अनेकजण आजारी पडत आहेत. यात तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. (Nashik Summer Heat Increase in fever patients news)

येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाने कात टाकली आहे. २१ व २२ एप्रिल हे दोन दिवस वगळता पारा ४० अंशाच्या वरच आहे. २१ एप्रिलला ३९.२ व २२ एप्रिलला ३९.६ एवढे तापमान होते. संपूर्ण एप्रिल महिना कडक उन्हात जात आहे. यात राष्ट्रपुरुषांच्या जयंती, सण-उत्सव व चैत्रोत्सव यात्रा पार पडली. कडक ऊन अंगावर झेलत श्रद्धाळू पायी यात्रेने गडावर गेले. सध्या येथील शासकीयसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. यात तापाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

उन्हापासून बचावासाठीच्या उपाययोजना

शक्य तेवढे पुरेसे पाणी प्यावे. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. लिंबू-पाणी, ताक, लस्सी, फळांचा रस व थोडे मीठ घालून घरगुती पेयांचे सेवन करावे. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी आदी पदार्थ खावीत. पातळ सैल, सूती कपडे वापरावे. बाहेर पडताना छत्री, टोपी, टॉवेल, गॉगलचा वापर करावा. दुपारी बारा ते पाच या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये. (Latest Marathi News)

Summer Heat
Nandurbar Summer Heat : नंदुरबार जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी; उन्हाचा तीव्रेतेत वाढ, उकाडाने नागरिक हैराण

तारीख - तापमान

१५ एप्रिल - ४२.६

१६ एप्रिल - ४२.६

१७ एप्रिल - ४३.२

१८ एप्रिल - ४३.४

१९ एप्रिल - ४२.०

२० एप्रिल - ४१.६

२१ एप्रिल - ३९.२

२२ एप्रिल - ३९.६

२३ एप्रिल - ४१.८

२४ एप्रिल - ४२.०

२५ एप्रिल - ४२.०

२६ एप्रिल - ४१.०

२७ एप्रिल - ४२.०

२८ एप्रिल - ४२.०

Summer Heat
Nashik Summer Heat : हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद; नाशिकचा पारा पोचला 41.2 अंश सेल्सिअसवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com