Nashik Summer Heat : वाढत्या तापमानामुळे भाजीपाला दर तापले

Nashik News : लिंबू, टोमॅटो, बटाटा, मटर यांच्या किमती सुद्धा सध्या प्रतिकिलो पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त झालेले आहे.
Vegetable
Vegetable esakal

Nashik News : उन्हाचा तडाखा वाढत असताना भाजीपाल्याच्या किमती ही चांगल्याच तापल्या आहे. लिंबू, टोमॅटो, बटाटा, मटर यांच्या किमती सुद्धा सध्या प्रतिकिलो पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त झालेले आहे. वाढलेल्या भाजीपाल्याच्या किमतीमुळे नागरिकांच्या खिशाला चांगली झळ बसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. (Nashik Summer Heat Vegetable prices increased due to rising temperature)

उन्हाळ्यात अधिक तापमान असल्यामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात विजेच्या पुरवठ्यात अनियमितता, त्यामुळे भाजीपाला स्टोअर करून ठेवता येत नाही. उन्हाळ्यात अधिक तापमान असल्यामुळे लिंबू, टोमॅटो, मटर, पालक, मेथी या भाजीपाल्यास अधिक मागणी असते.

लिंबात विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, लोह असल्यामुळे हा आरोग्यवर्धक आहे. सौंदर्य व आरोग्य या दोन्हीसाठी लिंबू हा अत्यंत गुणकारी असतो. उष्माघात, अशक्तपणा यासाठी सुद्धा लिंबू पाणी पिण्यासाठी नागरिक अधिक प्राधान्य देतात व काही तर नियमितपणे लिंबू पाणी पितात.

उन्हाळ्यामध्ये त्यामुळे लिंबाची मागणी वाढत आहे व त्या मानाने पुरवठा कमी आहे तसेच इतर भाजीपाला पदार्थांचेही तसेच आहे. हिवाळ्यात लिंबाचे भाव कमी होते, मात्र आता लिंबू जवळपास दीडशे रुपये किलो आहे. एका किलोमध्ये वीस ते 22 लिंबू बसतात, अजूनही हे भाव वाढण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Vegetable
Nashik Water Shortage : जिल्ह्यात 6 लाख नागरिकांची भागतेय टँकरच्या पाण्यावर तहान

भाजीपाला दर प्रतिकिलोप्रमाणे (किरकोळ बाजार)

लिंबू १५०

टोमॅटो १२०

बटाटा १६०

मटर १६०

"वाढलेल्या तापमानामुळे मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची आवक जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे जितकी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही. म्हणूनच भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहे. उन्हामध्ये भाजीपाला स्टोअर करून ठेवणे अवघड जाते व तो लवकर खराब होतो. जसजसे तापमान कमी होईल तशा भाजीपाल्याच्या किमती नियंत्रणात येतील असे वाटते." - संतोष जाधव, भाजी विक्रेता

Vegetable
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com