Nashik News : मोगरे येथे उन्हाळी नागली व वरईचा प्रयोग; बियाणे वाढविण्यासाठी सेंद्रिय नागलीचे अंतरपीक

Nashik : तालुक्यातील मोगरे येथील शेतकरी आनंदा गवारी व देवराम गवारी या दोघा भावंडांनी एक एकर मध्ये उन्हाळी नागली तर अर्धा एकर मध्ये वरईची लागवड केली आहे.
Farmers Ananda Gawari and Devram Gawari planted summer paddy in one acre and Varai in half an acre.
Farmers Ananda Gawari and Devram Gawari planted summer paddy in one acre and Varai in half an acre.esakal

Nashik News : तालुक्यातील मोगरे येथील शेतकरी आनंदा गवारी व देवराम गवारी या दोघा भावंडांनी एक एकर मध्ये उन्हाळी नागली तर अर्धा एकर मध्ये वरईची लागवड केली आहे. तालुक्याच्या काही दुर्गम भागात पावसाळी नागली केली जाते.मात्र,उन्हाळी नागली सहसा कुणी करीत नाही. तालुक्यात नागलीचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला आहे. चिखल न करता भातासारखी लागवड केली जाते लागवड केल्यानंतर दाणेदार नागलीचे कणसं येते. (nashik Summer Nagli and Vanrai experiment at Mogare farmer marathi news )

दाणे वेगळे करून उरलेला पाळा पाचोळा जनावरांना खाद्य म्हणून वापरले जाते.उन्हाळी नागलीला बाजारभाव ३५ ते ४५ रुपये किलो मिळतो.उन्हाळ्यात ही लागवड करणे सोपे नसते पावसाळी नागली लवचिक असते तर ही नागली ठिसूळ असते. पिकाला युरिया,दाणेदार शेणखत वापरले आहे. उन्हाळ्यात ही नागली आरोग्यासाठी थंड असते.यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

पावसाळी नागलीचे बियाणे उन्हाळ्यात चालत नाही.शेजारी अर्धा एकर मध्ये वरई एक फुटाचे अंतर ठेऊन लागवड केली असल्याचे शेतकरी गवारी यांनी सांगितले. कृषीमित्र देवराम गवारी यांनी आठ महिन्यांपूर्वी पठार शिवार आदिवासी गट स्थापन करुन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातून डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. (latest marathi news)

Farmers Ananda Gawari and Devram Gawari planted summer paddy in one acre and Varai in half an acre.
Nashik News : गोदावरी नागरी सहकारी बँकेला 3.16 कोटींचा नफा : अमृता पवार

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली माती परीक्षण,हरबरा बियाणे,ज्वारी बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहे.गटात २५ सभासद असून,लवकरच सेंद्रिय परसबाग तयार करणार असल्याचा त्यांचा मानस आहे. एका शेतीत केशर आंबा दहा बाय दहाचे अंतर ठेवले असून मधल्या पिकात दहा गुंठ्यांत आंतरपीक म्हणून उन्हाळी सेंद्रिय नागलीच्या पाच लाईन बसविण्याचा उन्हाळी नागलीचे बियाणे वाढविण्यासाठी हा प्रयोग आहे.

Farmers Ananda Gawari and Devram Gawari planted summer paddy in one acre and Varai in half an acre.
Nashik ZP News : 2 वर्षांचा निधी 8 दिवसांत खर्च; जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाची तत्परता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com