Nashik News : शारीरिक ऊर्जेला ‘बासरी’ची अशीही साथ; अवलिया कलावंताचा जाँगींग ट्रॅकवर बासरीचा रियाज ठरतोय लक्षवेधी

Nashik : अचानक बासरीचा सुरेल सूर पडले आणि सार्याच्या नजरा शोध घेऊ लागले असता, मैदानाच्या एका कोपर्यातल्या बाकावर बासरी वादनात रममाण झालेला कलावंत दिसला.
Flutist Sunil Bachhav along with famous singer Shankar Mahadevan.
Flutist Sunil Bachhav along with famous singer Shankar Mahadevan.esakal

नाशिक : पहाटेच्या वातावरणात वृंदावननगरच्या जाँगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी आलेल्यांच्या कानी अचानक बासरीचा सुरेल सूर पडले आणि सार्याच्या नजरा शोध घेऊ लागले असता, मैदानाच्या एका कोपर्यातल्या बाकावर बासरी वादनात रममाण झालेला कलावंत दिसला. जसजसे क्षण जाऊ लागले तसतसे एकापाठोपाठ बासरीतून निघालेली धून ऐकून अनेकाचे पाय थांबले तर काहीं चालता-चालता किती चालले हेच त्यांना कळाले नाही..... दैवी देणगी लाभलेल्या बासरी वादक कलावंताने शहरातील जॉगींग ट्रॅकवर येणार्यांना आपल्या बासरीने अक्षरश: खिळवून ठेवले. (sunil bachhav flute artist playing on jogging track is eye catching )

सुनील बच्छाव असे या अवलिया कलावंताचे नाव. ५९ वर्षीय बच्छाव हे मूळचे वीरदेल (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील. शाळेमध्ये असलेल्या बॅण्डपथकात असताना पहिल्यांदा त्यांच्या हाती बासरी लागली. वर्गमित्र गोपाळ पाठक याच्या घरातून त्यांना संगीताचे धडे गिरवता आले. पण त्यांना संगीताचे शास्त्रीय प्रशिक्षण मिळाले नाहीत. पुढे शिरपुरात शिक्षणासाठी आल्यानंतर बासरी वादनाची आवड जोपासली. तेव्हा बिना का गीतमाला अन्‌ रेडिओवर गाणी लागली की बच्छाव हे त्या गाण्याच्या चालीवर बासरी वाजवायचे.

यात त्यांचे कच्चे सूर कधी पक्के झाले, त्यांना कळालेच नाहीत. सातपूर एमआयडीसीतील सीएट टायरमध्ये नोकरी करतानाही बासरी सुटली नाही. आता तर नोकरी सोडून दिली अन्‌ स्वत:च्या अन्‌ दुसर्यांच्या आनंदासाठी बासरी वादन सुरू केले आहे. सर्वांत प्रथम ते कृषीनगर जॉगींग ट्रॅकवर पहाटेच बासरी घेऊन पोहोचले अन्‌ बासरीचा रियाज सुरू केला. जाँगींग करताना अनेकजण थांबले तर काहींना चालताना थकवाच जाणवला नाही.

रियाज संपल्यानंतर त्यांना ज्या प्रतिक्रिया जॉगर्सकडून आल्या, तेव्हापासून ते शहरातील जवळपास सार्याच जॉगींग ट्रॅकवर जाऊन बासरीवादन करू लागले. त्याचे झाले असे की त्याचा स्वत:ला आनंद तर मिळायचाच परंतु जॉगींगसाठी, खेळण्यासाठी आलेल्याप्रमाणेच, आरोग्याच्या तक्रारींमुळे पहाटेच्या वेळी मैदानावर येणार्यांनाही आनंद लाभायचा. येथूनच त्यांनी ‘मॉर्निंग फ्लूटिस्ट’ उपक्रम सुरू झाले, ते आजतागायत सुरू आहे. (latest marathi news)

Flutist Sunil Bachhav along with famous singer Shankar Mahadevan.
Nashik News : जलवाहिनी फोडून पिण्याच्या पाण्याची चोरी; चंदनपुरी येथील घटना

वृंदावननगरच्या उद्यानात असलेल्या जॉगींग ट्रॅकवर येणार्यांनी बच्छाव यांच्या या बासरी वादनाचा आनंद घेतला आणि सतत येण्याचाही आग्रह केला. यावेळी माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या उपस्थितीत उद्यानावरील जय श्रीराम जॉगर्स ग्रुप आणि महिलांच्या हास्य क्लबतर्फे सन्मानित करण्यात आले.

ताजच्या लॉबीत बासरीची धून

नाशिकच्या ताज हॉटेलमधील मुख्य लॉबीत दररोज सकाळी आठ वाजता बासरी धून वाजते ती बच्छाव यांचीच. त्यांच्या बासरीच्या सूरांनीच ताजमधील अनेकांचे डोळे उघडतात. ताजमध्ये आलेले प्रसिद्‌ध गायक शंकर महादेवन्‌, गायक आदेश बांदेकर, अभिनेत्री रविना टंडन, प्रसिद्‌ध संगीतकार नौशाद यांच्या कुटूबियांनी त्यांच्या बासरीला दाद दिली आहे.

येथे तर नेहमीच..

शहरातील तपोवन जॉगींग ट्रॅकसह कृषीनगर, गोल्फ क्लब, खुटवडनगर, संभाजी स्टेडिअम, सुयोजित व्हेरिडियन यासह स्वामी नारायण मंदिर, बालाजी मंदिर, काळाराम मंदिर याठिकाणी बच्छाव पहाटेला बासरीवादनासाठी नेहमीच जातात. एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांनाही त्यांच्या बासरीची आवड लागली आहे.

Flutist Sunil Bachhav along with famous singer Shankar Mahadevan.
Nashik News : सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com