Mahaonline Portal : महाऑनलाईनचे सर्व्हर 8 दिवसांपासून जाम; विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडकले

Nashik : राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेतंर्गत सुरूवातीस लागू केलेली उत्पन्न आणि डोमेसाईल प्रमाणपत्र सक्तीची अट शिथील केली.
Mahaonline
Mahaonlineesakal
Updated on

Mahaonline Portal : राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेतंर्गत सुरूवातीस लागू केलेली उत्पन्न आणि डोमेसाईल प्रमाणपत्र सक्तीची अट शिथील केली. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून बागलाण तालुक्यातील महाऑनलाईन सेतु केंद्रांचे सर्व्हर जाम झाल्यामुळे जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी अशी हजारो विद्यार्थ्यांची हजारो प्रमाणपत्रे अडकली आहेत. दहावी, बारावीनंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासोबत विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांना जातीचे आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र महाऑनलाईनद्वारे काढावे लागतात. (survey of Mp Online is stuck since 8 days jam students certificate )

मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा करताना सुरूवातीस पात्र महिलांना इतर कागदपत्रांसोबत उत्पन्न आणि डोमेसाईल या दोन प्रमाणपत्रांची सक्ती केली होती. त्यामुळे बागलाण तालुक्यातील सेतू सुविधा केंद्रांवर गेल्या आठ दिवसांपूर्वी उत्पन्न आणि डोमेसाईल दाखले काढण्यासाठी हजारो महिलांची मोठी झुंबड उडाली होती.

त्यानंतर शासनाने दोनच दिवसात योजनेसाठी उत्पन्न आणि डोमेसाईल या दोन प्रमाणपत्रांची अट रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे महिला वर्गाला दिलासा मिळाला. मात्र तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालकांनी या काळात महाऑनलाईन द्वारे दाखल केलेले हजारो दाखले अचानक सर्व्हर जाममुळे अडकले. अकरावी आणि प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे आणि नॉन क्रिमीलेयर असे विविध प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश घेता येत नाहीत. इतर कोणत्याही शैक्षणिक प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे अत्यावश्यक आहेत. (latest marathi news)

Mahaonline
Nashik News : कारची लोकल म्हणून नोंद तरीही 225 रुपये टोल वसूल; पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील प्रकार

निकाल लागून बराच काळ लोटलेला आहे. विद्यार्थी आणि त्यांचे पालक सेतू केंद्रावर प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून महाऑनलाईनचे सर्व्हर जाम असल्याने विविध प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश रखडल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मन:स्ताप होत आहे. प्रमाणपत्र ऑनलाईन कधी होणार आणि विद्यार्थी, पालकांच्या हातात कधी पडणार, ऑनलाईन अ‍ॅडमिशन कधी होणार, असे एक ना अनेक प्रश्‍न विद्यार्थी, पालकांना पडले आहेत. या बाबीकडे जिल्हाधिकाऱ्‍यांनी गांभीर्याने बघावे आणि महाऑनलाईनची सेवा तत्काळ सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

१० जुलै अंतिम मुदत

बागलाण तालुक्यात ७० अधिकृत सेतू सुविधा केंद्रांवरील चालकांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी जवळपास जातीचे, उत्पन्नाचे, डोमेसाईल, नेशनलिटी, नॉन क्रिमीलेयर असे जवळपास १५ हजार दाखले महाऑनलाईनवर अपलोड केले आहेत. मात्र, सर्व्हर जाम असल्याने सर्व दाखले अडकले असून, अद्याप एकही दाखला निघालेला नाही.

शासनाने ‘महाज्योती फ्री टॅबलेट’ योजनेंतर्गत ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करिता परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण घेतले जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेयर व डोमेसाईल दाखला सक्तीचा असून, १० जुलै २०२४ ही नोंदणीची अंतीम मुदत आहे. मात्र, महाऑनलाईनचे सर्व्हर जाम असल्याने दाखले अडकल्याने अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mahaonline
Nashik News : महामार्गावरील खड्ड्यांवर तोडगा निघण्याची आशा; आज मुंबईत बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.