

दिंडोरी, पेठ, वणी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ननाशी (ता. दिंडोरी) येथे ३७ वर्षीय तरुणाची कोयता व कुऱ्हाडीने शीर धडापासून वेगळे करून क्रूरपणे खून झाला. संशयित आरोपी असलेल्या पिता-पुत्राने मृताचे शीर घेऊन पोलिस स्टेशन गाठत स्वत:हून घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे ननाशी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.