पान-३ मेन
--------
NSK26H34436
नाशिक : भद्रकालीतील प्रणिता इंडिक फूड्स येथील अन्न पदार्थांची अस्वच्छता.
---------------NSK26H34486--NSK26H34488
नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाई व्यावसायिकांच्या दुकानांवर टाकलेल्या छाप्यातील छायाचित्रे.
-----------------
मिठाईच्या सहा दुकानांचे परवाने निलंबित
----------
एफडीएचा दणका : सणासुदीच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी सुरू होता खेळ
----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : सण- उत्सव विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नाशिक विभागामार्फत शहर आणि जिल्ह्यात अन्न आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. यादरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या नाशिकमधील सहा प्रमुख मिठाई उत्पादक आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, संदीप देवरे, दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता, संबंधित आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना व हाताळताना प्रचंड अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. उत्पादन क्षेत्रात अस्वच्छ परिस्थिती, अन्नावर झुरळांचे अस्तित्व तसेच ''अन्न सुरक्षा व मानके नियमांमधील'' अनुसूची ४ मधील तरतुदींचे अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या आरोग्याशी थेट निगडित असलेल्या या बाबींमध्ये कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, हे स्पष्ट करत प्रशासनाने संबंधित ५ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले.
अन्नपदार्थ तयार करताना व हाताळताना काटेकोर स्वच्छता राखणे, जागेची योग्य व्यवस्था ठेवणे, कीटक व झुरळांचा प्रादुर्भाव रोखणे तसेच अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करणे सर्व व्यावसायिकांसाठी बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही नियमित तपासणी करून अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीए प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक, श्रीमती अश्विनी पाटील, प्रतीक भड आणि श्रीमती ऋतुजा नवले यांच्या पथकाने पार पाडली.
भद्रकालीतील साक्षी गणपती येथील ''मे. प्रणिता इंडिक फूड्स प्रा. लि.'' या आस्थापनेवर छापा टाकत संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. या आस्थापनेमध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे तपासणीदरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आले. तेथे तयार करण्यात आलेला अन्नपदार्थांचा साठा अप्रमाणित असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ जप्तीची कारवाई केली.
१६-१
कारवाई करण्यात आस्थापने :
- मे. सिर्वी स्वीट्स, देवळाली कॅम्प, नाशिक.
- मे. कृष्णा सागर स्वीट्स, अशोका मार्ग, नाशिक.
- मे. पंचम स्वीट्स, तिडके कॉलनी, नाशिक.
- मे. साई बिकानेर स्वीट्स, ओझर बसस्थानकाजवळ, ओझर, (ता. निफाड)
- मे. उत्तम फरसाण अँड स्वीट्स, भगूर, नाशिक.
-''मे. प्रणिता इंडिक फूड्स प्रा. लि.'', भद्रकाली, नाशिक
------------------