पंचवटी: तपोवनातील कपिला नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांडपाणी गोदावरीच्या नदीपात्रात मिसळत असून, येणाऱ्या भाविकांच्या भावनांशी प्रशासनाकडून खेळ सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नदी स्वच्छता अभियानांतर्गत संरक्षणासाठी झालेली निवड, धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेली कपिला नदी महापालिकेच्या हलगर्जीमुळे दुर्दशेला पोहोचली आहे.