Nashik Teacher Constituency Result : विवेक कोल्हे, गुळवेंना आपसातील मतविभाजनाचा फटका

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्‍वास दुणावलेल्या महाविकास आघाडीला दूर सारत किशोर दराडे यांनी महायुतीचा मार्ग निवडला.
Kishor Darade, Adv. Sandip Gulve, Vivek Kolhe
Kishor Darade, Adv. Sandip Gulve, Vivek Kolheesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीचा ‘ट्रेन्ड’ विधान परिषदेच्या निवडणुकीतही कायम राहील, अशी अटकळ बांधत रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या दोघांनाही आपसातील मतांच्या विभाजनाचा फटका बसला. या तुलनेत आरोप-प्रत्यारोपांपासून स्वत:ला दूर ठेवत किशोर दराडे यांनी नियोजनाला प्राधान्य देत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी त्यांच्या यंत्रणेने अहोरात्र मेहनत घेतली.

या मेहनतीचे फळ म्हणजे महायुतीचा विजय तर झालाच, विशेष म्हणजे शिक्षक मतदारसंघात कुठलाही उमेदवार सलग दोन वेळा विजयी होत नाही, हा टिळाही पुसून टाकत त्यांनी नवा इतिहास घडविला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्‍वास दुणावलेल्या महाविकास आघाडीला दूर सारत किशोर दराडे यांनी महायुतीचा मार्ग निवडला.

त्यांच्या विरोधात मविप्र समाज शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी काँग्रेसमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीची रिक्त झालेली जागा भरून काढली. त्यामुळे ॲड. गुळवे विरुद्ध दराडे यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र या निवडणुकीच्या प्रारंभी निर्माण झाले. पण, कोपरगावच्या राजकारणात नावाजलेल्या कोल्हे कुटुंबाने या निवडणुकीत ऐनवेळी उडी घेतल्याने नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला.

विवेक कोल्हे यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने तिरंगी लढत होण्यास मदत झाली. सर्वाधिक मते असलेल्या नाशिक जिल्ह्यातून २५ हजारांवर मतांची नोंदणी झाली. दराडे व ॲड. गुळवे यांच्यात या मतांचे विभाजन होईल आणि त्याचा फायदा कोल्हे यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने सर्व नियोजनही झाले. कारण विवेक कोल्हे मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांचे भाचे असल्याने या संस्थेची मदत त्यांना होईल, यादृष्टीने त्यांनीही नियोजन केले. (latest marathi news)

Kishor Darade, Adv. Sandip Gulve, Vivek Kolhe
Nashik Teacher Constituency Result : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत किशोर दराडे दुसऱ्यांदा उत्तीर्ण

त्यात कर्मवीर काकासाहेब वाघ, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या संस्थांचाही हातभार लागेल, असेही त्यांचे नियोजन होते. केवळ अहमदनगरच नव्हे तर नाशिकमध्येही मतांची आघाडी घेऊन आपण विजयापर्यंत पोचण्याचा त्यांचा अंदाज राहिला. प्रत्येक जिल्ह्यात पोचल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मतदारांपर्यंत पोचविण्यावर त्यांनी सर्वाधिक भर दिला.

तर ॲड. गुळवेंनी मविप्र संस्थेचे सर्वाधिक मतदार आपल्याला तारतील, अशा स्वरूपाचे नियोजन करून प्रचार यंत्रणा राबविली. त्यांच्या व्यासपीठावर शिक्षक संघटनांपेक्षा राजकीय गोतावळा अधिक असल्याचे दिसून आले. सभांना होणारी गर्दी ही मतदानात परावर्तित करण्यात त्यांना अपयश आल्याचे या निकालातून दिसून येते. कोल्हे व ॲड. गुळवे यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे १७ हजार व १६ हजार मते मिळाली.

या दोघांमध्येच मतांचे फार विभाजन झाल्याचे आकडेवारी सांगते. या तुलनेत किशोर दराडे यांनी प्रसारमाध्यमांपासून चार हात लांब आणि आरोपांना प्रत्युत्तर देण्यात वेळ घालविला नाही. प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट त्यांनी साध्य केल्याचे मतपेटीतून दिसून आले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणुकीला जातीय रंग देण्याचा सोयीस्कर प्रयत्नही झाला. पण त्याकडे लक्ष न देता आपली यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबवत त्यावरच दराडेंनी भर दिला.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve, Vivek Kolhe
Nashik Teacher Constituency Result: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ! ठाकरे गटाच्या आक्षेपानंतर मतमोजणी प्रक्रिया थांबवली!

केवळ एका समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रित करून आपण विजयी होणार नाही, याची जाणीव ठेवून त्यांनी खानदेश, नंदुरबारपासून नाशिक, अहमदनगरच्या शेवटच्या मतदाराला साद घातली. शिक्षण संस्था व प्रत्येक मतदाराला वैयक्तिक भेटण्यासाठी सज्ज असलेली यंत्रणा यांचा हा विजय म्हणावा लागेल.पहिल्या पसंतीची मतमोजणी पूर्ण होताच दराडे ‘डेंजर झोन’मधून बाहेर पडले होते.

परिणामी, त्यांच्या विजयाचा मार्ग दुसऱ्या फेरीत अधिक विस्तृत होत गेला. सोमवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी संपली. शिक्षक मतदारसंघात एक उमेदवार सलग दोन वेळा विजयी होत नाही हा इतिहास त्यांनी बदलवला आहे. दुसऱ्यांदा फक्त काठावर पास झाले नाही तर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत विधान परिषदेवर शिवसेनेचा भगवा त्यांनी डौलाने फडकविला आहे.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve, Vivek Kolhe
Nashik Teacher Constituency Election : नाशिक शहरात मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करताना एकजण ताब्यात

एक विजय झाला, दुसऱ्याचे काय?

तब्बल सहा वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे प्रथमत: विजयी झाले. त्यांच्या विजयाच्या दिवशीच किशोर दराडे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का केला. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत संपूर्ण ५४ तालुक्यांचा मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी पहिला विजय मिळविला होता.

त्या वेळी धुळ्याचे संदीप बेडसे व अहमदनगरचे भाऊसाहेब कचरे यांना पराभूत करत दराडेंनी हा विजय खेचून आणला. नरेंद्र दराडे महाविकास आघाडीत आहेत. किशोर दराडे महायुतीकडे आहेत. दोन्ही भावांचे पक्ष वेगवेगळे असल्यामुळे एक आमदार झाला, आता दुसऱ्याचे काय, असा प्रश्‍न येवल्यात चर्चेला आला आहे.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve, Vivek Kolhe
Nashik Division Teachers Constituency Election: शिक्षक, शिक्षण अन शिक्षणसंस्थांना न्याय देणार : ॲड. संदीप गोपाळराव गुळवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com