Nashik Teacher Protest : वेतन प्रणालीत नाव समाविष्टसाठी शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

Teacher Protest : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चार शिक्षकांची नावे वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यास वेतन अधीक्षक कार्यालयाकडून अडवणूक केली जात आहे.
strike
strikeesakal

Nashik Teacher Protest : नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बारागाव पिंप्री (ता. सिन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चार शिक्षकांची नावे वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यास वेतन अधीक्षक कार्यालयाकडून अडवणूक केली जात आहे. या निषेधार्थ शिक्षकांनी वेतन व भविष्यनिर्वाह निधी अधीक्षक कार्यालयासमोर १५ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. (Nashik Teacher Protest warning for name inclusion in salary system marathi news)

याबाबत दीपाली तांबे, जयश्री धुमणे, सुरेश जाधव, गणेश लोहकरे या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाला निवेदन दिले आहे. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचालित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (बारागाव पिंप्री, ता. सिन्नर) येथे १५ वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर काम केले. शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांनी केलेल्या आंदोलन, उपोषण यांची दखल घेऊन नोव्हेंबर २०२० मध्ये २० टक्के अनुदान दिले.

त्यानुसार सर्व अर्जदार शिक्षकांना नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यत शासनाचा २० टक्के पगार देखील ऑफलाइन मिळाला. त्यानंतर जून २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ विभागीय अध्यक्ष यांच्याकडून शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यास मान्यता मिळाली. त्यानुसार १७ ऑगस्ट २०२२ मध्ये अधीक्षक वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक यांचेकडे शालार्थ प्रणालीत वेतन देयकात नाव समाविष्ट होण्यासाठी प्रस्ताव दिले. (latest marathi news)

strike
Nashik Teachers Protest : प्राथमिक शिक्षकांचा टाहो! ‘आम्हाला शिकवू द्या हो’चा आक्रोश; गोल्फ क्लबवरच काढला मोर्चा

या कालावधीत संस्थेतील २० टक्केवर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु अधीक्षक वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक विभागाने वेगवेगळे कारणे देत, चार शिक्षकांचे शालार्थ आदेश असतानादेखील जाणीवपूर्वक शालार्थ वेतन प्रणालीत नावे समाविष्ट केले नाही. तसेच सर्व शिक्षकांनी १५ वर्षे विनापगार काम केले.

अनुदान मंजुरीनंतर वेतन सुरू झाले.त्यानंतर आठ महिन्यांचा पगार ऑफलाइन मिळाला, असे असताना वेतन शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करत नसल्याने बंद झाला आहे. कोणताही दोष नसताना सातत्याने अन्याय होत आहे. वेतन अधीक्षक यांच्याकडून जाणूनबुजून शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यास टाळाटाळ होत आहे.

त्यामुळे आमच्या कुटुंबीयांचा मानसिक ताण वाढत आहे. याविरोधात अनेकदा तक्रारी करून न्याय मिळत नसल्याने शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यासाठी उपोषणास बसत आहोत. सोमवार (ता. १५) पासून हे आंदोलन वेतन अधीक्षक कार्यालयासमोर केले जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

strike
Nashik Teacher Protest: माध्यमिक शिक्षकांचे उद्या धरणे आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com