Nashik Tree Plantation : दुष्काळात झाडे जगवण्यासाठी शिक्षकांची धडपड

Nashik News : यंदा पुरेशा पावसाअभावी सर्वत्र दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मानवांसह प्राण्यांच्या जगण्याची पाण्यासाठी केविलवाणी परिस्थिती आहे.
Teacher Yogesh Deore and cook Dinesh Ahire watering the trees of Zilla Parishad Primary School with cans.
Teacher Yogesh Deore and cook Dinesh Ahire watering the trees of Zilla Parishad Primary School with cans.esakal

मालेगाव : यंदा पुरेशा पावसाअभावी सर्वत्र दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मानवांसह प्राण्यांच्या जगण्याची पाण्यासाठी केविलवाणी परिस्थिती आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत वर्षभर लेकरांप्रमाणे जोपासलेली झाडे जगवण्यासाठी आनंदवाडी(मेहुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक योगेश देवरे यांची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे. (Teachers struggle to save trees during drought)

आपली शाळा सर्वांग सुंदर बनविण्यासाठी सर्वच शिक्षक प्रयत्न करतात. परिसर सुशोभीकरण करून शालेय आवारात झाडेही मोठ्या प्रमाणावर लावतात. शहरातील शरद दुसाने ज्वेलर्सने शाळेचा परिसर बघून निंब, मोगरा, आंबा, बॉटल पंप, सिल्वर ओक, कन्हेर, गुलाब, मेंटेलिया, बकुळ, मयूरपंखी अशी चार हजार रुपयांची पंचवीस झाडे भेट दिली होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त मिळालेल्या रोपांचे श्री. देवरे व सहकारी शिक्षिका भाग्यश्री शेवाळे यांनी संवर्धन केले. मेहुणे गावाच्या परिसरात असलेल्या छोट्याशा शंभर घरांच्या वस्तीवरील ही आनंदवाडी शाळा, मेहुणे गाव टंचाईग्रस्त असल्याने दोन महिन्यांपासून शासनाकडून टॅंकरने पाणी पुरवठा होतो.

ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती असताना अशावेळी या झाडांना पाणी कसे देणार? आनंदवाडी भागात टॅंकर पोहचत नाही. श्री. देवरे गुरुजी यांनी स्वतःच्या मोटार सायकलला पन्नास लिटरची कॅन बांधून आसपासच्या परिसरातून विहिरीवरून पाणी आणले. दर दोन दिवसाआड या झाडांना दीडशे लिटर पाणी द्यावे लागते. तीन खेपा दर दोन दिवसांनी गुरुजी आणतात. आनंदवाडी एखाद्या युवकाची मदत ते घेतात. (latest marathi news)

Teacher Yogesh Deore and cook Dinesh Ahire watering the trees of Zilla Parishad Primary School with cans.
Nashik City Transport : बत्ती गुलमुळे सिग्नल यंत्रणा बंद! शहरात वाहतुक कोंडी

सुट्टी असतानाही गुरुजी आपल्या लेकरांप्रमाणे अबोल बालकांना जीव लावत 'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा कृतिशील धडाच येणाऱ्या पिढ्यांना देत असल्याचे गौरवोद्गार ग्रामस्थ काढतात. शिक्षकांची तळमळ बघून पालक साहेबराव हिरे यांनी एक टॅंकर विकतचे पाणी उपलब्ध करून दिले होते.

"आजूबाजूला दुष्काळ असताना झाडे जगवणं सोपे नाही. गुरुजींनी स्वतः पुढाकार घेऊन दर दोन दिवसांनी स्वतः पाणी आणले. आम्हाला सार्थ अभिमान आहे. हेच कृतिशील संस्कार जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळतात." - समाधान हिरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, आनंदवाडी.

"आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपणच शिपाई ते मुख्याध्यापक असतो. कर्तव्यपरायण असले, की आनंद मिळतो. चिमुकल्यांना असे प्रत्यक्ष धडे व मूल्यांचे शिक्षण पर्यावरण संरक्षणातून देता येते." - योगेश देवरे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी.

Teacher Yogesh Deore and cook Dinesh Ahire watering the trees of Zilla Parishad Primary School with cans.
Nashik News : सुधाकर बडगुजरांना अंशत: दिलासा! उपायुक्तांकडून 10 दिवसांची मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com