नाशिककरांना संमिश्र वातावरणाची अनुभूती; तापमान 7.8 अंशांवर

Temperature
Temperatureesakal

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील गारठा वाढला आहे. अशात सध्या दिवसा कडक ऊन आणि सायंकाळनंतर गारठा, अशा संमिश्र वातावरणाची अनुभूती नाशिककर घेत आहेत. शनिवारी (ता. २९) नाशिकचे किमान तापमान ७. ८ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.
गेल्‍या मंगळवारी (ता. २५) नाशिकचे किमान तापमान ६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

रात्रीच्‍या शेकोट्यांचा आधार

मात्र त्‍यानंतर सातत्‍याने पारा वाढत चालला होता. शुक्रवारी (ता. २८) नाशिकचे किमान तापमान १०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. पुन्‍हा पाऱ्यात घसरण झाली असून, शनिवारी नाशिकचे किमान तापमान ७. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तर कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. दरम्‍यान, आभाळ स्‍वच्‍छ राहात असल्‍याने सध्या दिवसा कडक ऊन पडत आहे. सायंकाळनंतर मात्र वातावरणात गारवा जाणवत आहे. रात्रीच्‍या वेळी थंडीत शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत असल्‍याची सध्याची स्‍थिती आहे.

Temperature
वातावरण बदलंय, अशी घ्या तब्येतीची काळजी!

जळगाव गारठले

शनिवारी जळगावचे किमान तापमान ७.३ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. हे तापमान राज्‍यातील नीचांकी ठरले आहे. तर गोंदिया- ७.६, औरंगाबाद- ८.०, पुणे- ८.६, महाबळेश्‍वर- १०.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

Temperature
नाशिक : आकस्मित मृत्यूंचं प्रमाण वाढलं; दिवसभरात पाच जणांनी गमावले प्राण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com