नाशिक : आकस्मित मृत्यूंचं प्रमाण वाढलं; दिवसभरात पाच जणांनी गमावले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

नाशिक : आकस्मित मृत्यूंचं प्रमाण वाढलं; दिवसभरात पाच जणांनी गमावले प्राण

नाशिक : वाढत्या थंडीत श्वास घेण्याच्या त्रासाने मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शहरात शुक्रवारी (ता. २८) वेगवेगळ्या भागात श्वास घेण्याच्या त्रासातून पाच जणांचे मृत्यू झाले.

नाशिक रोडला तोफखाना मार्गावरील आवटे मळ्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने संतोष जगन्नाथ परदेशी ( ५१) यांना गुरुवारी (ता. २७) रात्री महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉ. बोराडे यांनी मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत सोपान आनंदाराम गवळी (५६ रा. कमलनगर, हिरावाडी) यांना शुक्रवारी (ता. २८) दुपारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राची 'मास्क' बंदी हटवणार का ? आदित्य ठाकरेंचा खुलासा


तिसरा प्रकार जेल रोडला पंचक शिवारातील बोराडे मळ्यात उघडकीस आला. भास्कर भिवाजी जाधव (७५ रा. राहुलनगर) यांना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ठसका लागून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. गायकवाड यांनी मृत घोषित केले. चौथ्या घटनेत योगेश रघुनाथ साळी (४०, रा. श्याम अपार्टमेंट, सिद्धिविनायकनगर) यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. राम पाटील यांनी मृत घोषित केले.


पाचवा प्रकारात गोळे कॉलनीत घडला. भाजीपाला खरेदीला गेलेली महिला बेशुद्ध होऊन मृत्यू झाला. विमल एकनाथ निचळ (६७, रा. गोळे कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी साडेअकराला रस्त्यावर चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. राम पाटील यांनी मृत घोषित केले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक : जळीत सांगाड्याचा ‘डीएनए’ तपासणार

Web Title: Deaths Due To Respiratory Distress Increased In Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNashikdeath