Nashik Summer Heat : पुन्हा पारा चाळिशी पार, प्रखर सूर्यकिरणे; सायंकाळनंतरही उन्हाची झळ

Summer Heat : प्रखर सूर्यकिरणांमुळे उकाड्यात वाढ होऊन नाशिककरांची पुन्हा लाही लाही होऊ लागली आहे.
Summer Heat
Summer Heatesakal
Updated on

Nashik Summer Heat : प्रखर सूर्यकिरणांमुळे उकाड्यात वाढ होऊन नाशिककरांची पुन्हा लाही लाही होऊ लागली आहे. दिवसभरासह सायंकाळनंतरही उन्हाळ्याची झळ नागरिक अनुभवता आहेत. रविवारी (ता.१९) नाशिकचे कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस राहिले, तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअसची नोंद घेतली आहे. आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा पारा चाळिशी पार पोचला आहे. कधी नव्हे ते यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते आहे. ( temperature has once again crossed 40 marks in city )

अगदी मार्च महिन्यापासून वातावरणात उष्णता निर्माण होऊन पाऱ्यात वाढ नोंदणी गेली होती. मात्र वातावरणातील बदलांमुळे मार्च व नंतर पुढे एप्रिल आणि मेमध्येदेखील पाऱ्यात सातत्याने चढउतार सुरू होता. सूर्य आग ओकू लागल्याने जनजीवन प्रभावित होत असल्याचे चित्र शहर परिसरात बघायला मिळत होते. दुपारी ११ पासूनच सायंकाळी चार-पाचपर्यंत बाजारपेठांमध्ये तुरळक स्वरूपात गर्दी बघायला मिळत होती.

मात्र गेल्या आठवड्याभरापासून वळिवाच्या पावसाने हजेरी लावल्याने पाऱ्यात घसरण नोंदवली गेली होती. यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढग दाटून येत असले तरी पाऊस बरसत नव्हता. ढगाळ वातावरणामुळे मात्र उकाड्यात आणखीनच भर पडत होती. (latest marathi news)

Summer Heat
Nashik Summer Heat : आधी पारा चाळिशी पार! नंतर 4 अंशांपर्यंत घसरण; ढगाळ वातावरण, वाऱ्याचा परिणाम

रविवारी दिवसभर निरभ्र आकाशात असले तरी प्रखर सूर्यकिरणांमुळे पारा पुन्हा वाढून चाळिशी पार पोचला आहे. येत्या काही दिवसांमध्ये उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांना एसी, कुलर, फॅन यांसारख्या घटकांचा आधार घ्यावा लागतो आहे.

मतदान रोडावणार?

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर आधी बेमोसमी पावसाचे संकट होते. परंतु आता तप्त उन्हाचे आव्हान मतदानाचा टक्का वाढीपुढे असणार आहे. यातून दुपारी बारा ते तीन चारपर्यंतची मतदान प्रक्रिया संथ राहण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी मतदारांचा उत्साह पाहता सोमवारी (ता.२०) सकाळी पहिल्या टप्प्यात व दुपारनंतर मतदानाच्या अंतिम टप्प्यात मतदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

Summer Heat
Nashik Summer Heat : सर्वाधिक उष्माघाताचे 23 रुग्ण नाशिक जिल्ह्यात; रुग्णसंख्येत वाढ होण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com