काळाराम, त्र्यंबक मंदिर, सप्तशृंगी देवस्थानांना धमकी

काळाराम, त्र्यंबक मंदिर, सप्तशृंगी देवस्थानांना धमकी
Published on: 
H34828/34829 काळाराम, त्र्यंबक, सप्तशृंगी देवस्थानांना धमकी नाशिक शहर- ग्रामीण पोलिसांकडून सुरक्षेत वाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : शहरातील प्राचीन काळाराम मंदिरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगीदेवी या देवस्थानांना समाजकंटकांकडून धमकीचे ई-मेल आल्याने नाशिक शहर-ग्रामीण पोलिस ‘अलर्ट मोड’वर आले आहेत. तातडीने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दरम्यान, गेल्या आठवड्यातही नाशिकसह राज्यातील जिल्हा न्यायालयांनाही धमकीचे ई-मेल आले असता, पोलिसांनी कसून तपासणी केली असता, सदरील बाब अफवा असल्याचे समोर आले होते; परंतु या पार्श्वभूमीवर पोलिस व सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या राज्यातच नव्हे, तर देशभर दिवाळीचा आनंदोत्सव आहे. दिवाळी सुट्यांमध्ये देवदर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी होत असते. याच अनुषंगाने समाजकंटकांनी राज्यातील काही देवस्थानांच्या कार्यालयीन ई-मेलला धमकीचे मेल पाठविले आहेत. या ई-मेलची माहिती तत्काळ स्थानिक पोलिस यंत्रणांना देण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर देवस्थानांनाही धमकीच्या स्वरूपाचे ई-मेल आलेले आहेत. या ई-मेलची गंभीर दखल शहर व ग्रामीण पोलिसांनी घेतली. पंचवटीतील काळाराम मंदिरासह जिल्ह्यातील मंदिरांची सुरक्षा व्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक-नाशक पथकांसह श्वानपथकाने काळाराम मंदिर परिसर पिंजून काढला. तसेच, पोलिस गस्तीसह कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचप्रमाणे, त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज मंदिर आणि सप्तशृंगदेवी मंदिर परिसरातही कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांची कसून तपासणी केली जात आहे. मेटल डिटेक्टरचा वापर केला जातो. संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. कोट (फोटो वापरावा) श्री काळाराम मंदिर देवस्थानला धमकीचा ई-मेल आला आहे. त्याची गंभीर दखल घेत, बंदोबस्तात वाढ करण्यात आली. तसेच, पथकांकडून कसून तपासणीही करण्यात आलेली आहे. पोलिस गस्तही वाढविण्यात आली. भाविकांनी कोणतीही भीती बाळगू नये. पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. - संदीप मिटके, सहायक आयुक्त, शहर गुन्हे शाखा, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.