Nashik Fire Accident: सटाणा शहरात मध्यरात्री पुन्हा भीषण अग्नितांडव! 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान; 2 महिन्यातील तिसरी घटना

Fire Accident News : आगीने क्षणार्धात भीषण स्वरूप घेतल्याने या परिसरात एकच हाहाकार उडाला होता.
Ashok Vastra Bhandar and Suyog Desses, a ready-made clothing store on Tilak Road burned circuit in the middle of the night.
Ashok Vastra Bhandar and Suyog Desses, a ready-made clothing store on Tilak Road burned circuit in the middle of the night.esakal

सटाणा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टिळक रस्त्यावरील अशोक वस्त्र भांडार व सुयोग डेसेस या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला मध्यरात्री शाँटसर्किटमुळे भीषण आग लागली. आगीने क्षणार्धात भीषण स्वरूप घेतल्याने या परिसरात एकच हाहाकार उडाला होता.

सटाणा अग्नीशमन दलाला वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी आगीत जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचे नवीन कपडे जळून खाक झाले आहेत. शहरातील दुकानांना आग लागण्याची दोन महिन्यातील तिसरी घटना घडली असुन अशा घटनांमुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Nashik terrible fire in cloth shop Satana)

दुकानाला मध्यरात्री शाँटसर्किटमुळे भीषण आग लागल्याने आगीत जाळून खाक झालेला लाखो रूपयांचा कपड्यांचा माल व फर्निचर.
दुकानाला मध्यरात्री शाँटसर्किटमुळे भीषण आग लागल्याने आगीत जाळून खाक झालेला लाखो रूपयांचा कपड्यांचा माल व फर्निचर. esakal

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टिळक रस्त्यावरील शिंपी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत शांताराम निकुंभ यांच्या मालकीच्या अशोक वस्त्र भांडार व सुयोग डेसेस या तीन मजली रेडिमेड कापड दुकानाला मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

शाँक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दुकानाचे मालक चंद्रकांत निकुंभ कुटुंबियांसोबत शहरातील नववसाहतीत वास्त्यव्यास आहेत. त्यांना आगीची माहिती समजताच त्यांनी तातडीने चिरंजीव सुयोग निकुंभ यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. आगीचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरातील नागरिक सुद्धा दुकानाजवळ पोहोचले.

सर्वांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. त्यात काही नागरिकांनी सटाणा अग्निशमन दलाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. सटाणा अग्नीशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून रौद्ररुप घेतलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. (latest marathi news)

Ashok Vastra Bhandar and Suyog Desses, a ready-made clothing store on Tilak Road burned circuit in the middle of the night.
Nasrapur Fire Accident : सारोळा-पांडे येथील इंडो-आफ्रीका पेपर मिल्स कंपनी मध्ये आग

परंतु, आगीत सुमारे ४० ते ५० लाख रुपये किंमतीचे नवीन कपडे जळून खाक झाले. दुकानातील फर्निचर सुध्दा आगीत जळून खाक झाले आहे. संपुर्ण दुकानात जळालेले कपडे व फर्निचरचा कोळसा दिसत होता. आगीची धग वरच्या मजल्यावर गेली असती तर अजून मोठा अनर्थ घडला असता आणि कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असते. सटाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपुत यांनी सहकार्‍यांसोबत घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 

गेल्या दोन महिन्यात शहरातील कापड दुकानाला आग लागल्याची ही तिसरी घटना असुन यापूर्वी सुभाष रोड क्रमांक एक मधील शिंपी समाजाचे अध्यक्ष रोहित तरटे यांचे मनीषा ड्रेसेस हे कपड्यांचे दुकान, शहर पोलीस चौकी समोरील शिंपी समाजाचेच कार्यकर्ते कृष्णा जगताप यांचे स्वामी कलेक्शन व शादाब तांबोळी यांचे एस टू जी हे कपड्यांचे दुकान या दुकानांना आग लागून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Ashok Vastra Bhandar and Suyog Desses, a ready-made clothing store on Tilak Road burned circuit in the middle of the night.
Nashik Fire Accident : आगीत 10 दुकाने खाक! कोट्यवधींचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com