Nashik News : नाशिक-ठाणे, कसारापर्यंत टॅक्सीची भाडेवाढ नाही; चालक-मालक संघटनेचा निर्णय

Nashik : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मुंबई- पुणे, मुंबई-शिर्डी आणि मुंबई- नाशिक दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित टॅक्सीचे दर ५० ते २०० रुपयांची वाढवले आहेत.
taxi (file photo)
taxi (file photo)esakal

Nashik News : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मुंबई- पुणे, मुंबई-शिर्डी आणि मुंबई- नाशिक दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित टॅक्सीचे दर ५० ते २०० रुपयांची वाढवले आहेत. मात्र, नाशिक ते ठाणे, कसाऱ्यापर्यंतचे दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांना या निर्णयाचा कुठलाही तोटा होणार नाही. नाशिक ते शिर्डीचे दर गाडीप्रमाणे ठरवले जात असल्यामुळे त्यातही बदल होणार नसल्याचे श्रमिक टॅक्सी चालक-मालक संघटनेने स्पष्ट केले आहे. (Nashik There is no increase in taxi fare to Nashik Thane and Kasara marathi News )

नवीन निर्णयानुसार एसी टॅक्सी प्रवासासाठी मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना नाशिकसाठी १०० रुपये अधिक आणि शिर्डीसाठी २०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. पुणे एसी आणि नॉन-एसी टॅक्सी प्रवासासाठी ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मुंबई- नाशिक आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील एसी टॅक्सीचे सुधारित भाडे सध्याच्या ४७५ आणि ६७५ रुपयांऐवजी अनुक्रमे ५७५ आणि ८२५ रुपये असेल.

टॅक्सी भाडेदरात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या खटुआ समितीच्या अहवालानुसार भाडे सुधारण्यास मंजुरी दिली आहे. प्राधिकरणाने ही भाडेवाढ लागू करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. आगामी सुटीचा काळ लक्षात घेता तातडीने याची अंमलबजावणी होणार असल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या निर्णयाचा नाशिकच्या टॅक्सीच्या भाड्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे श्रमिक टॅक्सी चालक संघटनेने म्हटले आहे. (latest marathi news)

taxi (file photo)
Nashik News : रामसेतूचे भवितव्य अखेर रामभरोसे! नवीन पूल दूरच, दुरुस्तीबाबतही चालढकल

साध्या टॅक्सीने नाशिकवरून ठाण्यापर्यंत २०० रुपये तर, कसाऱ्यापर्यंत १३० रुपये भाडे आकारले जाते. यात वाढ झालेली नाही. द्वारका सर्कल येथून शिर्डीसाठी बसेस किंवा टॅक्सी सुटते. गाडी आणि प्रवाशांच्या संख्येवरून हा दर ठरवला जातो. त्यामुळे नाशिक ते शिर्डी अशा प्रवासासाठी वेगवेगळे दर आहेत. बहुतेक प्रवासी ट्रॅव्हल्स आणि लक्झरीनेच प्रवास करतात. त्यामुळे ‘एमएमआरटीए’च्या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचे दिसते.

सध्याचे टॅक्सी भाडे

नाशिक ते ठाणे: २०० रुपये

नाशिक ते कसारा : १३० रुपये

''नाशिकवरून कसारा आणि ठाण्यापर्यंत दररोज दोनशे टॅक्सी जातात. या प्रवासात साधी टॅक्सी चालत असल्याने दरवाढ करण्याविषयी आमच्या संघटनेने काहीही निर्णय घेतलेला नाही.''-वसीम (नेते) शेख, पूर्व विभाग प्रमुख, श्रमिक टॅक्सी चालक-मालक संघटना, नाशिक

taxi (file photo)
Nashik News : वेतन अधीक्षकांकडून थकीत बिलांची अडवणूक; नीलेश साळुंखे यांच्यासह शिक्षकांनी केला पर्दाफाश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com