Nashik News : गोदाकाठावरुन साडेतीनशे किलो कचरा संकलित! नाशिक प्‍लॉगर्सचा पुढाकार, रंगपंचमीनंतर विशेष स्‍वच्‍छता मोहीम

Nashik News : नाशिक प्‍लॉगर्स या संस्‍थेच्‍या पुढाकाराने राबविलेल्‍या या उपक्रमात सुमारे साडेतीनशे किलो कचरा संकलित करण्यात आला.
Volunteers and office bearers participated in the special cleanliness drive in Godakath area on Sunday.
Volunteers and office bearers participated in the special cleanliness drive in Godakath area on Sunday.esakal

नाशिक : रंगपंचमीच्‍या सणानिमित्त रामतीर्थ परिसरात नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती. यातून गोदाकाठ परिसरात झालेला कचरा संकलित करण्यासाठी रविवारी (ता.३१) विशेष स्‍वच्‍छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक प्‍लॉगर्स या संस्‍थेच्‍या पुढाकाराने राबविलेल्‍या या उपक्रमात सुमारे साडेतीनशे किलो कचरा संकलित करण्यात आला. (Nashik Three half hundred kilos of garbage collected from godaghat news)

नाशिक प्लॉगर्सतर्फे गोदावरी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती तसेच आर्ट ऑफ लिव्‍हिंग, टाटा एआयजी यांसारख्या संस्‍थांकडून सहकार्य मिळाले. सुमारे दीडशेहून अधिक स्‍वयंसेवकांनी सहभागी होताना गोदावरी नदीकाठच्‍या परिसराची स्‍वच्‍छता केली.

रविवारी सकाळी सात ते साडे आठदरम्‍यान पार पडलेल्‍या या स्‍वच्‍छता मोहिमेत या भागात पडलेल्‍या काचेच्‍या बाटल्‍या, प्‍लॅस्‍टिक पिशवी, टाकून दिलेले कपडे व इतर कचरा संकलित करण्यात आला. या उपक्रमासाठी नाशिक प्लॉगर्सचे संस्थापक तेजस तलवारे, अध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष आदित्य गिते आणि सहाय्यक उपाध्यक्ष अद्वैत शुक्ला आदी स्वयंसेवक उपस्थित होते. निष्ठा, सुसंगतता आणि समर्पण या संकल्‍पनांवर काम करताना संस्‍थेतर्फे यापुढेही सामाजिक कार्य केले जाणार असल्‍याची ग्‍वाही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.  (latest marathi news)

Volunteers and office bearers participated in the special cleanliness drive in Godakath area on Sunday.
Bhandara-Gondiya Loksabha: भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतपत्रिकेवर २५ वर्षांनंतर दिसणार पंजा, 'या' ३ पक्षांत तिरंगी लढत

बालकांपासून ज्‍येष्ठांचा सहभाग

या स्‍वच्‍छता मोहिमेत शाळकरी मुलांपासून ज्‍येष्ठ नागरिक स्‍वयंसेवकांनी सहभाग नोंदविला होता. युवक-युवतींची संख्या देखील लक्षणीय राहिली. काही युवकांचे समूह उपक्रमात सहभागी झाले होते.

Volunteers and office bearers participated in the special cleanliness drive in Godakath area on Sunday.
Nashik March End Recovery: मार्च एंडिंगसाठी रात्रभर जागली सरकारी कार्यालये! मध्यरात्रीपर्यंत अधिकारी अन कर्मचाऱ्यांची धावपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com